Home / राजकारण / राजूरकर आणि चिखलीकर यांच्यात लढत होण्याची शक्यता!

राजूरकर आणि चिखलीकर यांच्यात लढत होण्याची शक्यता!

नांदेड विधान परिषद निवडणुकीत माजी आ. राजूरकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यात लढत होण्याची शक्यता!

नांदेड (विजय निलंगेकर)
नांदेड विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा असतानाच प्रवीण पाटील चिखलीकर यांनी निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून ट्विस्ट निर्माण केला आहे यामुळे माजी आ. अमर राजूरकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यात लढत होईल अशी शक्यता दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपा या पक्षाला मोठे यश मिळाले असून या यशाच्या जोरावर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून केला गेला परंतु ज्या प्रमाणात ही चर्चा झाली तेवढ्याच प्रमाणात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांना विरोध करण्यासाठी विरोधक एकवटल्याची चिन्ह दिसून येत आहेत पारंपरिक पद्धतीचे अशोकराव चव्हाण यांचे विरोधक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या मुलाला या निवडणुकीत उतरविल्याने नगरसेवकांमध्ये उत्साह संचारला आहे.

नांदेड विधान परिषदेची जागा शिंदेला सुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटणार आणि या जागेवर प्रवीण पाटील चिखलीकर यांची वर्णी लागणार अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे असे झाले तर भाजपा आणि शिवसेना या पक्षांनी मैत्री लढत लढतील असे वाटत आहे.
राज्यात शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी या तिघांची सत्ता असली तरीही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे यामुळे यांचा दावा प्रबळ असून याही परिस्थितीत जर शिंदे सेनेला जागा सुटली तर भारतीय जनता पार्टी कडूनही उमेदवार उभे करण्याची तयारी भाजपाने केली आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी आ. अमरनाथ राजुरकर यांनी यापूर्वीही दोन वेळा ही निवडणूक जिंकली आहे एकदा बिनविरोध निवडणूक झाली तर दुसऱ्यांदा आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे शिंदे यांना पराजित करून राजूरकर हे विजय झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल