आज धडाकेबाज नवीन जुन्या गाण्याची मेजवानी
नांदेड दि. 20
नांदेड शहरात गेल्या सहा ते सात वर्षांपासून विजय निलंगेकर यांनी कुमार सानू फ्रेंड्स क्लब तर्फे विविध संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण करून नांदेडकरांचे मनोरंजन करीत आहेत आज सायंकाळी नव्या आणि जुन्या गाण्याची धडाकेबाज मेजवानी नांदेडकरणांना मिळणार आहे


येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे दि. 20 जून 26 रोज शनिवार सायंकाळी साडेसहा वाजता विजय निलंगेकर प्रस्तुत कुमार सानू फ्रेंड्स क्लब आयोजित यादे या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उप महापौर दीपक सिंह रावत, नगरसेवक तुलजेश यादव यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात एमडी जमाल, अलीम भाई, रवी गोयल, बळीराम कदम, सुजाता खाडे, ललिता डूलगच व विजय निलंगेकर हे गायक कलाकार गीतांचे सादरीकरण करतील या कार्यक्रमात किशोर कुमार, कुमार सानू, विनोद राठोड, रूप कुमार राठोड, मोहम्मद रफी, अर्जित सिंग, लता मंगेशकर, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आशा भोसले, सुदेश भोसले येसुदास, सुरेश वाडकर, सुखविंदर सिंग यांनी गायलेल्या गायनाचे सादरीकरण होणार आहे तरी नांदेडकर प्रशिक्षतांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आव्हान कुमार सानू फ्रेंड्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.










