Home / शैक्षणिक / इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

नांदेड दि. 12 जून
महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळ, पुणेमार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत इयत्ता 5 वी प्राथमिक स्तर व इयत्ता 8 वी उच्च प्राथमिक स्तराच्या मूल्यमापनासाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यासाठी 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत मूल्यमापन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मूल्यमापनाचा निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर 11 जून 2026 रोजी जाहिर करण्यात आला आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सदर माहितीची प्रिंट घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे इयत्ता 5 वी ते 8 वी ची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरीत करण्यात येईल असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल