Home / सामाजिक / भरोसा सेल मध्ये महिलांची कुचंबना

भरोसा सेल मध्ये महिलांची कुचंबना

भरोसा सेल मध्ये महिलांची कुचंबना

नांदेड दि.9 मे 26
नांदेड पोलीस दलातर्फे कौटुंबिक समस्या असलेल्या महिलांची तक्रार भरोसा सेल या विभागात घेतल्या जाते या ठिकाणी शेकडो महिला आपलं गराणे मांडण्यास येतात परंतु येथे महिलांची कुचंबना होताना दिसून येत आहे

नांदेड पोलीस मुख्यालय वजीराबाद येथे कौटुंबिक समस्येत उद्भवलेल्या समस्येवर तक्रार करण्यासाठी निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून याचे नाव भरोसा सेल असे आहे या ठिकाणी दररोज महिला आपल्या तक्रारी घेऊन येत असतात व त्यानंतर पीडित महिला आणि त्यांच्या पतीमध्ये समन्वय साधण्यासाठी बोलावलं जाते यासाठी एका महिलेला आपल्या तक्रारीवर चर्चा करण्यासाठी पाच ते सहा वेळेस यावं लागतं यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही असतात अशा पद्धतीने या भरोसा असेल मध्ये शेकडो महिलांचे आगमन होत असते परंतु या ठिकाणी या महिलांसाठी शौचालयाची व्यवस्थाच करण्यात आली नसल्याने महिलांची कुचबना होताना दिसून येत आहे या महिलांना किंवा पुरुषांना शौचालयाची व्यवस्था नसल्याने मुख्य इमारतीच्या शौचालयात जाण्याची वेळ येते व या इमारतीत जात असताना त्यांना अनेक वेळा हटकल्या जाते मध्ये येण्यास मज्जाव ही केला जातो.
भरोसा सेल कार्यालय हे मुख्य इमारतीच्या थोड्या अंतरावर असल्याने महिलांना ये जा करणे अवघडले जाते याकडे नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी लक्ष घालून या महिलांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी या पीडित महिलाकडून होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल