आ. बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
नांदेड दि. 1 जून 26:
नांदेड उत्तर मतदारसंघाचे आ. बालाजीराव यांच्या कल्याणकर वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आरोग्यविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे न आयोजन करण्यात आले आहे. या न. कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे आणि जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी केले आहे.
मौजे मरळक, ता. जि. नांदेड येथील विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात सोमवार, दि. १ जून रोजी सकाळी १०.०० ते १२ या वेळेत ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर नगरभोजनाचा कार्यक्रम होणार असून सर्व भाविक-भक्त, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याच ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील ए. के. संभाजी मंगल कार्यालय येथे सायंकाळी ७ ते १० या. वेळेत प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या ‘संगीत संध्या’ या भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार कल्याणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आ. कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. हनुमान गड येथे महाआरती, नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान वाटप, श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात फळवाटप तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रुग्णांना अन्नदान व वृक्षारोपणासाठी रोपांचे वितरण करण्यात येणार आहे. आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भरगच्च कार्यक्रमांमुळे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
–










3 Comments
talk about optimism!!!
My goldfinch loves to play with it.
this product is awesome.