नांदेड जिल्हा काँग्रेस नव्या नेतृत्वाची घोषणा; दक्षिण, उत्तर व शहराध्यक्षांची निवड
नांदेड दि. २१ मे
राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस (दक्षिण) अध्यक्षपदी खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हा काँग्रेस (उत्तर) अध्यक्षपदी विठ्ठल गंगाधर पावडे यांची निवड करण्यात आली असून नांदेड शहर (जिल्हा) महानगर काँग्रेस अध्यक्षपदी अब्दुल गफार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटनाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष बांधणी, संघटन विस्तार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
नवनियुक्त सर्व अध्यक्षांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस तसेच पक्ष विस्ताराच्या कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










