स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान
नांदेड़, दि.१५ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मनपातील विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “ऑफिसर ऑफ द मंथ आणि एम्पलोयी ऑफ द मंथ” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराच्या माध्यमातून शहराच्या विकासात आणि नागरी सुविधा पुरवण्यात अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. नगरचना, लेखा, आरोग्य, स्वच्छता, माहिती व तंत्रज्ञान, आणि प्रशासकीय विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली.पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना “ऑफिसर ऑफ द मंथ आणि एम्पलोयी ऑफ द मंथ” हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी ०३ वर्षापूर्वी करण्यात आली होती.
मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल “ऑफिसर ऑफ द ईयर” हा पुरस्कार *उपायुक्त स.अजितपालसिंग संधु* यांना प्रदान करण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, विकास कामात येणाऱ्या अडथळे दूर करण्यासह शहर विद्रूपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत बॅनरबाजीला रोखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून वेळेप्रसंगी कठोर भूमिका घेत तब्बल १५ गुन्हे दाखल करून अनधिकृत बॅनरबाजीवर आळा आणलेला आहे. तसेच शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी फ्री लेफ्ट या संकल्पनेतून वाहतुकीची कोंडी दूर करण्याचे काम संधू यांनी केले , मागील वर्षभरातील या सर्व कामगिरीची नोंद घेऊन संधू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे माहे मे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते* यांना प्रदान करण्यात आला तर एम्पलोयी ऑफ द मंथ साठी माहे मे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लेखा विभागातील *वरिष्ठ लिपिक स.सतपालसिंग कोल्हापुरे यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच माहे जुन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे यांना प्रदान करण्यात आला तर एम्पलोयी ऑफ द मंथ साठी माहे जुन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माहिती व तंत्रज्ञान विभागातील कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर मंजू व्यास आणि स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक प्रियंका एंगडे यांची संयुक्तपणे निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी मग्गिरवार यांना प्रदान करण्यात आला तसेच एम्पलोयी ऑफ द मंथ साठी माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक निलेश शातलवार यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.










One Comment
Nội dung hay và thực tế. Letco là đơn vị du học Hàn Quốc giàu kinh nghiệm, đồng hành cùng học viên từ A-Z. Ghé letco.vn để được tư vấn miễn phí.