पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ११५ वा पुरस्कार देऊन दिलीप ठाकूर यांचा सपत्नीक गौरव
नांदेड । प्रतिनिधी
वर्षभरात तब्बल ९० विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी सेवाकार्याची अखंड ज्योत तेवत ठेवणारे ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या बहुआयामी सामाजिक कार्याचा भव्य सोहळ्यात गौरव करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण कार्यालय, नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ॲड. ठाकूर यांना ‘सामाजिक आयकॉन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.ॲड. दिलीप ठाकूर यांना मिळालेला हा ११५ वा पुरस्कार आहे.
कुसुम सभागृहात झालेल्या या शानदार सोहळ्यास खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण तथा सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भाजपाचे संजय कोडगे, चैतन्यबापू देशमुख, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, सचिन उमरेकर, सुरेश लोट, व्यंकटेश साठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविका मध्ये सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांनी कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्र्यांनी दिलीप ठाकूर यांची पाठ थोपटली. निवेदक प्रा. ओमप्रकाश दरक यांनी ॲड. दिलीप ठाकूर यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा उल्लेख करताना त्यांच्या सेवाकार्याला ‘समाजसेवेतील एव्हरेस्ट’ अशी उपमा दिली. समाजातील गरजू घटकांना आधार देण्यासाठी वर्षानुवर्षे सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या विविध उपक्रमांचा गौरव यावेळी करण्यात आला.
ॲड. ठाकूर यांच्या समाजसेवेची व्याप्ती आणि सातत्य यामुळे त्यांना आतापर्यंत विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून तब्बल ११५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र रत्न, लोकशाही मराठवाडा रत्न, मराठवाडा भूषण, नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार, देवदूत उपाधी, कर्मयोगी पुरस्कार, दीनबंधु सेवा पुरस्कार, गुरूवर्य पांडूरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार, लायन्स एप्रिसिएशन अवार्ड, दि लिजेंड अवार्ड, नंदिग्राम एक्सलंस नॅशनल अवार्ड, संवेदना राष्ट्रीय पुरस्कार, मानवता के सेवक पुरस्कार, कृतज्ञता उत्सव पुरस्कार, नांदेड के सांता, शान-ए-नांदेड, इंस्पायर पर्सनॅलिटी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपति शिवाजी गौरव पुरस्कार, सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगुताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानड़ा राजा पंढरीचा राष्ट्रीय अनुग्रह पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड, कृतज्ञता सेवा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, मराठी अपडेट गौरव पुरस्कार यांसह अनेक मान-सन्मानांचा समावेश आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या कठीण काळातही ॲड. ठाकूर यांनी समाजसेवेची धुरा अखंडपणे सांभाळली. त्यांच्या कार्याची दखल घेत तब्बल २२ संस्थांनी त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित केले. विशेष म्हणजे यापैकी १६ संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्राबाहेरील आहेत. समाज कल्याण विभागानेही त्यांच्या कार्याचा गौरव ‘संवेदनशील सेवा पुरस्कार’ देऊन केला आहे.
यावेळी लायन्स क्लबतर्फे प्रांतपाल ला. राहुल औसेकर यांनी मानाची पिन आणि मोत्याची माळ देऊन ॲड. दिलीप ठाकूर यांचा विशेष सत्कार केला. ला. योगेश जायस्वाल, ला. दिलीप मोदी, ला. जयेश ठक्कर आणि ला. अमरसिंह चौहान यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.दरम्यान, ॲड. दिलीप ठाकूर यांच्या ११५ व्या पुरस्काराबद्दल शिवप्रसाद राठी, प्रा. लक्ष्मी पुदरोड,स्नेहलता जायस्वाल, मानिनी नांदेडकर, सुरेश शर्मा, गणेशसिंह परमार, जगतसिंह ठाकूर, संतोष बच्चेवार, प्रकाश उंटवाले, संजय चौधरी ,बिना चौहान यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील समाजसेवी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










