३० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटला; प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पुल व नाली बांधकामास सुरुवात
नांदेड दि. 20 ऑगस्ट
लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकातून जुना लोहा शहरात कलालपेठ – मारोती मंदिर -भोईवाडा ते थेट बायपास उड्डाणपूल नॅशनल हायवे या मार्गास नंदिकेश्वर नगरातील पुलाचे काम झाल्याने विना अडथळा जाता येणार आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या पुलाचे व नाली बांधकामाचे नारळ फोडण्यात आले असून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला तसेच आमदार चिखलीकर यांनी निवडणूक काळात दिलेले आश्वासनपूर्ती करण्यात आली. नगराध्यक्ष शरद पवार उपनगराध्यक्ष करीम शेख व टीमच्या प्रयत्नांना शहरात चांगले काम करण्यात यश मिळत आहे.
मुख्य चौकातून जुन्या शहरात जाणार सिमेंट रस्ता झाला आहे नंदिकेश्वर नगरात पुलाचे बांधकाम गेल्या 30 वर्षांपासून रखडले होते निवडणूक काळात आ प्रतापराव पाटील यांनी नगराध्यक्ष शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल नागेश बगाडे याचा प्रचारार्थ येथील नागरिकांना नाली व पूल करून देण्याचे आश्वसन दिले होते . नगराध्यक्ष शरद पवार या प्रभागाचे नगरसेविका लक्ष्मी छत्रपती धुतमल, नगरसेवक गणेश बागडे यांचा पुलाचा पाठपुरावा सुरूच होता. अंतर्गत वाद मिटला आणि १९ ऑगस्ट( गुरुवारी ) युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या पुलाचे व नाली बांधकामाचे नारळ फोडण्यात आले आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली त्यांनी शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नगराध्यक्ष शरद पवार उपनगराध्यक्ष करीम शेख व त्याचे सर्व सहकारी नगरसेवक चांगले काम करत आहेत असे गौरवोद्गार काढले.निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही दिली
नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, गटनेते भास्कर पवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, गणेश बगाडे, तुकाराम दाढेल, राजेश बोडके, ईरबा पवार, सदा तेलंग, पंकज परिहार नगरसेवक मारोतराव जंगले कैलास काळेकर, सतीश निकाते, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष छत्रपती स्वामी, माजी नगरसेवक बाबुराव डोम, अशोक शेटे, मलकाअर्जुन शेटे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता शेटे, शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण काजले, शिवानंद शेटे, सतीश शेटे, राजू शेटे, लहू घोडके गुतेदार ऋषी पाटील. इंजिनिअर शरद राहेरकर उपस्थिती होते
जुन्या व नव्या शहराला जोडणारा पूल-नगराध्यक्ष पवार
नगराध्यक्ष शरद पवार उपनगराध्यक्ष करीम शेख व त्याचे सर्व सहकारी शहरासाठी चांगले काम करताहेत विशेषतः रस्ते निर्मितीवर भर आहे .नंदिकेश्वर नगरातील हा पूल जुन्या व नव्या शहराला जोडणारा सेतू आहे याचा फायदा शहराच्या विकासाठी भविष्यात उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास नगराध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला










