Home / महानगरपालिका / मनपा या बॅनर वर कारवाई करेल का

मनपा या बॅनर वर कारवाई करेल का

मनपा या बॅनर वर कारवाई करेल का
नांदेड दि. 21ऑगस्ट
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे अनधिकृत बॅनरवर कारवाईची मोहीम राबवली असून अधिकृत असे बॅनर लावावे यासाठी विविध ठिकाणी तळे निर्माण केले परंतु शासनानेच या योजनेला हरताळ फास्ट दिसून येते.
मागच्या सहा महिन्यापासून महानगरपालिकेने सर्वसाधारण जनतेला आपल्या होणाऱ्या कार्यक्रमाचे जाहीर करण्यासाठी विविध ठिकाणी अधिकृतरित्या बॅनर लावण्याचे जागा निश्चित केले आहेत आणि त्याचे दरही निश्चित केले आहेत शहरांमध्ये कुठेही बॅनर लावून विद्रूपीकरण होऊ नये याची काळजी महापालिकेने घेतल्याची दिसून येते व यासाठी महापालिकेला कराच्या रूपात उत्पन्नही होते परंतु शासनानेच अनधिकृत बॅनर लावल्याचे दिसून येत आहे.
जल संवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी जलसंवर्धन उपक्रमावर लोकसहभाग वाढविण्याचे साठी 21 ऑगस्ट 2026 रोजी जलसंधारण दिनानिमित्ताने नांदेड येथे तीन किलोमीटर अंतराची वॉक फॉर वाटर महावाकथॉन आयोजित केली आहे ही स्पर्धा शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथून सकाळी सात ते आठ यादरम्यान स्पर्धा होणार आहे या स्पर्धेची माहिती जनतेसमोर जावी या उद्देशाने शासनातर्फे बॅनर उभे केले आहेत परंतु हे बॅनर अनधिकृतरित्या लावल्याने आता चर्चेला उधाण आले आहे या बॅनरवर महानगरपालिका कारवाई करेल का असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल