नांदेड विधान परिषदेचे निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही लढवण्याची तयारी
नांदेड दि. 22 मे
लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष, वसंतनगर, नांदेड या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, नागनाथराव घिसेवाड, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजीराव टेकाळे, उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करीम शेख, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, कंधार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे, देगलूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, देगलूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अंकुशराव देसाई, माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दिन बाहोदिन, कुंडलवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमूलवार, लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे नगरसेवक साबेर चाऊस, नांदेड वाघाळा शहर नगरपालिकेचे नगरसेवक हबीब बावजीर, सचिन नाईक, भास्कर पवार, श्रीनिवास नरवाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.










