Home / गुन्हा / बिलोली शहर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

बिलोली शहर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

बिलोली शहर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

नांदेड – (विजय निलंगेकर)
नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवर असलेले बिलोली शहर या शहरांमध्ये अवधधंद्याचा ऊत आला असून रेती उपसा, मुरूम उत्खनन, मटका आणि जुगार ही अवधंदे सर्रासपणे चालू असून याकडे विभागीय पोलीस उपअधीक्षक पानेगावकर यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी जिवाचे रान करत आहेत त्या पाठोपाठ पोलीस अधीक्षक नीलम रोहन हे रुजू झाल्यापासून अवैध धंदे चालु नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे परंतु बिलोली शहरात गेल्या काही महिन्यापासून अवैध धंद्यांना ऊत आले असून विभागीय पोलिस अधिकारी पानेगावकर यांनी मात्र या अवैध धंधांकडे काना डोळा केल्याचे दिसून येत आहे

बिलोली शहरात जुने बस स्टँड व नवीन बस स्टँड या भागामध्ये मटका जोरात चालू असून ऑनलाईन मटकाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे एवढेच नव्हे राज्यभर बंद असलेले गुटखा बिलोली शहरात सर्रासपणे विकल्या जात आहे व खरेदी केले जात आहे याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे एवढेच नव्हे तर जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात असून तीन ते चार ठिकाणी जुगार अड्डे असल्याची आता चर्चिला जात आहे या सर्व धंद्यामध्ये शहरातील युवक आकर्षिले जात असून त्यांचे जीवन बरबाद होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे ठिकठिकाणी अवैध दारू विक्री ही चालू आहे यामुळे अनेक वेळा पालकांनी पोलीस प्रशासनाकडे या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली असूनही दुर्लक्ष का होत आहे हा प्रश्न अजूनही या नागरिकांच्या मनात पडलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल