महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती की नांदेड जिल्हा प्रशासन जनतेची दिशाभूल करत आहे
नांदेड – विजय निलंगेकर
महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड जिल्हा दौरा 19 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत असून दौरा समितीचे सदस्य जिल्ह्यातील विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी माहिती नांदेड जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे दिली आहे.
या दौऱ्यादरम्यान बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते दहा असे तीस मिनिटांचा कालावधी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांच्यासाठी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी दिलेला दिसून येत आहे परंतु नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सभापती यांची गेल्या तीन ते चार वर्षापासून निवड झाली नाही तर हे अनौपचारिक गप्पा कोणाशी करणार आहेत असा आता नांदेडकरांना प्रश्न पडला आहे सकाळी शासकीय विश्राम गृहमध्ये या प्रतिनिधीशी चर्चा करणार असल्याची माहिती प्रशासनाचे अधिकृत जिल्हा माहिती अधिकारी यांनी ही माहिती पुरवली आहे.
नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत तर नांदेड जिल्ह्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती कुठून येतील आणि चर्चा करतील अशी आता चर्चा रंगू लागली आहे ही दिशाभूल जिल्हा प्रशासनाची आहे की महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे असा हास्यस्पद चर्चा आता शहरात एक वेळेस मिळत आहे










