आ. चिखलीकर यांच्या पाठपुराव्याने कर्करोगग्रस्त रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीतून १.२५ लाखांची मदत
नांदेड, प्रतिनिधी :
लोहा तालुक्यातील कमलाकर सखाराम तिगोटे यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख २५ हजारांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने ३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, मंजूर झालेली रक्कम नांदेड येथील स्टार किडनी सेंटर सुपरस्पेशालिटी अँड आय हॉस्पिटलच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. संबंधित रुग्णावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या आर्थिक मदतीमुळे रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असलेला आर्थिक आधार उपलब्ध झाला असून, कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गरजू रुग्णांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना निधी मिळवून देण्यात आ. चिखलकर हे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मंजूर व्हावी यासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही आर्थिक मदत मंजूर झाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून मंजूर झालेल्या सहाय्यता निधीचे पत्र रुग्णाचे नातेवाईक वैजनाथ पवार , साहेबराव नाईक , अमोल टिगोटे यांना आ. चिखलीकर यांनी सुपूर्द केले.










