Home / राज्य / नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

नांदेड- प्रतिनिधी
नांदेडची रेल्वे संपर्क सुविधा अधिक बळकट करण्यासाठी 06 जुलै, 2026 रोजी दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये एक गाडी नांदेड–मुंबई आणि दुसरी टनकपूर–नांदेड दरम्यान धावणार आहे. या दोन्ही गाड्यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री श्री रवनीत सिंह, केंद्रीय राज्यमंत्री श्री जितिन प्रसाद आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री अजय टम्टा हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री श्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे, खासदार श्री अशोकराव शंकरराव चव्हाण, विधान परिषद सदस्य व हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष श्री हेमंत श्रीराम पाटील, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे, खासदार डॉ. अजित माधवराव गोपछडे, खासदार श्री रवींद्र वसंतराव चव्हाण, विधान परिषद सदस्य श्री विक्रम वसंतराव काळे, विधान परिषद सदस्य श्री सतीश भानुदासराव चव्हाण, विधान परिषद सदस्य श्री अमरनाथ अनंतराव राजूरकर, आमदार श्री बालाजी देविदासराव कल्याणकर तसेच आमदार श्री आनंद शंकर तिडके हे हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला अलीकडील काळात मोठी गती मिळाली असून, पायाभूत सुविधा विकास, क्षमता वृद्धीची कामे आणि रेल्वे स्थानकांच्या व्यापक आधुनिकीकरणाची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत केला जात असून, जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. याच दिशेने हजूर साहिब नांदेड येथून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यापैकी एक गाडी राज्याच्या राजधानी क्षेत्राशी तर दुसरी देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणार आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये :

नांदेड–मुंबई–नांदेड एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला व मनमाड मार्गे धावेल.

या गाडीत आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल.

टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नांदेडहून रविवारी तर टनकपूरहून मंगळवारी धावेल.
ही गाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांना देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देईल.
सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.
पर्यटन व तीर्थयात्रेला चालना मिळेल.
व्यापार व वाणिज्याच्या संधींमध्ये वाढ होईल.
देशाच्या पश्चिम व उत्तर भागांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल.
आरोग्य व शिक्षण सुविधांपर्यंत अधिक चांगली पोहोच उपलब्ध होईल.
विद्यार्थी, व्यावसायिक, कुटुंबे, भाविक, पर्यटक आणि उद्योजक यांना अधिक आरामदायी व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल.
प्रदेशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल