Home / राजकारण / 75 लाखाची मागणी 50 लाखावर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर यांच्याकडून नगरसेवक स्वेच्छा निधी मंजुरी

75 लाखाची मागणी 50 लाखावर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर यांच्याकडून नगरसेवक स्वेच्छा निधी मंजुरी

75 लाखाची मागणी 50 लाखावर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर यांच्याकडून नगरसेवक स्वेच्छा निधी मंजुरी

नांदेड – विजय निलंगेकर
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा तीन महिन्यापासून रेंगाळली होती ती आज शंकरराव चव्हाण सभागृहात पूर्ण पडली या सभेत सभागृहनिता महेश कन्नड यांच्याकडून प्रति प्रभाग 75 लाख स्वेच्छा निधीची मागणी केली यावर महापौरांनी 50 लाखाची स्वेच्छा निधी मान्य केली.

महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आली असून कर्जाच्या ओजाखाली महानगरपालिका असली तरी मागच्या तीन वर्षापासून वार्डाच्या स्वेच्छा निधी खर्च झालं नाही कारण या काळामध्ये प्रशासक होता आणि नगरसेवक नसल्यामुळे खर्च झाला नसल्यामुळे यावेळेस मागचा बॅकलॉग भरून काढणे हा एक पर्याय असून प्रत्येक प्रभागात 75 लाखाची कामे मंजूर करावी अशी मागणी सभा गृहनेता महेश कनकदंडे यांनी केली. यावर उत्तर देताना महापौर सौ कविता संतोष मुळे यांनी 50 लाख रुपये स्वेच्छा निधी मंजूर करण्याचे जाहीर केले यावरून नगरसेवकांना मोठा जॅकपॉट लागण्याची चर्चा आता शहरांमध्ये बोलल्या जात आहे
प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांनी मागील तीन वर्षाच्या काळामध्ये प्रशासकीय सत्ता असताना आयुक्त यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी असेही सांगितले तर विकास निधीमध्ये महापौरांकडून रक्कम दर्शविली जाते परंतु आयुक्त कडून यावर झिरो अशी रक्कम दर्शविली जाते या गोष्टीची आयुक्तांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांमध्ये आयुक्तांना सुनावले मागचे तीन वर्षाच्या काळामध्ये अनेक आर्थिक उलाढाल झाल्या त्यावेळेस आयुक्तांनी मनमानी केली याचा एकता वाचून यावर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली

काँग्रेसचे गटनेता अब्दुल गफ्फार यांनी मुस्लिम बहुल एरी असलेल्या देगलूर नाकामध्ये विकास कामे करावी जनतेच्या सुखसुई कडे लक्ष द्यावे तसेच AI धरतीवर शहरामध्ये मुथा चौक आयटीआय चौक साठे चौक यावर सिग्नल व्यवस्था उभारली जात आहे हीच व्यवस्था देगलूर नाका परिसर बरकी चौक या ठिकाणीही सिग्नल व्यवस्था उभी करावी अशी मागणी केली

महापालिकेच्या आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून त्यांना परवानगी देऊन रक्कम महसूल करण्यात यावे यावर सभागृहात एकमत झाले
नांदेड महानगरपालिकेची रखडलेल्या या सभेकडे सर्व नगरसेवकांचेच नव्हे तर नांदेड करांची ही लक्ष लागून होते. महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली यावेळी उपमहापौर दीपक रावत आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे नगरविकास सचिव अजित पाल संधू सभापती वीरेंद्र सिंग गाडीवाले यांच्यासह पालिकेतील सर्व नगरसेवक व नगरसेविका व त्यांचे पती आणि नगरसेवकांचे पाठीराखेही उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल