Home / शैक्षणिक / GDA/ANM/GNM/BSc Nursing पास युवकांना सुवर्णसंधी

GDA/ANM/GNM/BSc Nursing पास युवकांना सुवर्णसंधी

नांदेड जिल्ह्यातील युवकांना इस्रायलमध्ये ३ हजार ५०० ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

*’महाराष्ट्र इंटरनॅशनल’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन*

नांदेड, दि. 6 मे : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये ‘घरगुती केअरगिव्हर’ (Home Based Caregiver) या पदासाठी ३ हजार ५०० उमेदवारांची मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आरोग्य आणि सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

*भरतीचे मुख्य तपशील आणि पात्रता:*
या भरती प्रक्रियेत ९० टक्के महिला आणि १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्जदाराचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि किमान १० वी उत्तीर्ण पात्रता अनिवार्य आहे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर आणि वजन ४५ किलो किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील (Intermediate) ज्ञान असणे गरजेचे आहे.
*शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता:*
उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये किमान ९९० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरी यापैकी मान्यताप्राप्त संस्थेचा डिप्लोमा किंवा पदवी (GDA/ANM/GNM/BSc Nursing) धारण केलेली असावी.
*वेतन आणि इतर सवलती:*
निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ६४४३.८५ Israeli New Shekel (NIS) म्हणजेच अंदाजे १ लाख ९९ हजार ७७० रुपये इतके आकर्षक वेतन मिळेल. याशिवाय नियोक्त्याकडून राहण्याची सोय, भोजन आणि वैद्यकीय विम्याची सुविधा पुरवली जाणार आहे.
*नोंदणी प्रक्रिया:*
इच्छुक पात्र उमेदवारांनी आपली माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ https://maharashtrainternational.com या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीनंतर पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन आणि व्हिडिओ मुलाखतीद्वारे पार पडेल.
*महत्वाच्या अटी:*
उमेदवाराने यापूर्वी कधीही इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, पालक किंवा मुले) सध्या इस्रायलमध्ये कार्यरत नसावेत. निवड प्रक्रियेसाठी पोलीस पडताळणी अहवाल (PCC) आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य राहील.
अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी उमेदवारांनी त्वरीत अधिकृत पोर्टलला भेट द्यावी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल