स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी आश्चर्यकारकरीत्या अतुल भोसले यांची इंट्री
नांदेड दि. 24 मे (विजय निलंगेकर)
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेत येण्यासाठी अनेक दिग्गज प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या नोटांच्या करून अधिकाऱ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतात परंतु या सर्वांना बाजूला सारून आश्चर्यकारक रित्या बिलोली येथील कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियुक्ती झाल्याने पोलीस दरात धक्का तंत्र वापरल्याचे बोलल्या जात आहे
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या न त्या कारणाने वादग्रस्त ठरलेले उदय खंडेराय यांना शेवटी अचानक पणे पायउतार व्हावे लागले पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी आश्चर्यकारक रित्या एन्ट्री केली होती परंतु त्यांची ती किमया ते टिकू शकले नाहीत अनेक वेळा आपल्या कार्यात असफल ठरलेल्या उदय खंडेरायांनी मात्र कुठलीच प्रतिक्रिया किंवा कुठलाच भाव न दाखवता शांतपणे आपले काम केले परंतु काल अचानक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आश्चर्यकारक रित्याच त्यांना बाजूला किल्ल्याची दिसून येत आहे काल पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नावाची आदेशही निघाला आणि त्यांनी रात्री पदभार स्वीकारला पदभार स्वीकारण्याची एवढी घाई का झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असे प्रसारमाध्यमातून बोलल्या जात असल्याची खंत दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकारांसमोरच बोलून दाखविले आणि मागच्या एक वर्षाचा गुन्हेगारीचा ताळमेळ पत्रकारांसमोर ठेवला आणि यामध्ये जवळजवळ 30 ते 35 टक्के गुन्हेगारी मागच्या वर्षी प्रमाणात कमी झाल्याचे आकडेवारी समोर ठेवली यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव यांचीही उपस्थिती होती यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई चा ऊहापोह करण्यात आला परंतु दोन दिवसात असे काय घडले ही पोलीस निरीक्षक उदय खंडेरायांना पायउतार व्हावे लागले हा आता चर्चेचा विषय बनला आहे वास्तविक पाहता बिलोली पोलीस स्टेशन हद्दीत ही ज्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे अवैध धंद्यांना ऊत आला आहे त्या प्रमाणात पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी बसविण्यात आले याचे गमक येत्या काळात कळेलच अशी चर्चा आता सुरू झाली आहे











