Home / राजकारण / भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या आंदोलनाचा फज्जा

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या आंदोलनाचा फज्जा

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या आंदोलनाचा फज्जा
नांदेड दि.
मोदी सरकारने लोकसभेत मांडलेले महिला विधेयकास विरोधकांनी हाणून पडल्याने भाजपा कार्यकर्ते संतापले असून विरोधकांच्या माथ्यावर आपले अपयश थोपण्यासाठी भारतभर आंदोलन सुरू केली आहे याचाच एक भाग आज नांदेडमध्ये आयटीआय चौक परिसरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे आंदोलन निदर्शने ठेवण्यात आली होती या आंदोलनात जेमतेम 100 कार्यकर्ते हजर झाल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाल्याची चर्चा आता शहरात होत आहे.

महिला विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा विरोध आणि निशेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे आज आयटीआय चौकामध्ये निदर्शने आंदोलने ठेवण्यात आली होती यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला आणि पुरुष दिसून आले विशेष म्हणजे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत 26 महिला नगरसेवक असून यापैकी जवळ तीन महिला नगरसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या त्यापैकी दोन या पदाधिकारी होत्या एक म्हणजे महापौर आणि दुसऱ्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती यामुळे या आंदोलनात महिलाच उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे

या आंदोलनासाठी महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर आणि आमदार श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती राहणार असे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले होते परंतु या आंदोलनाकडे आमदार श्रीजया चव्हाण या नांदेडमध्ये असूनही या आंदोलनाकडे फिरकल्या नाहीत या आंदोलनात महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र सिंग गाडीवाले नगरसेवक आशिष नेरलकर यांच्यासह पाच 25 कार्यकर्ते उपस्थित होते व पाच 25 महिला उपस्थित होत्या परंतु भाजपा युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्या या कार्यक्रमाला दिसून आल्या नाही

आंदोलन महिला विधेयकावर असूनही आंदोलनात महिलाच सहभागी झाल्या नसल्याने चर्चेला उधाण आले महानगरपालिकेतल्या नगरसेविका या केवळ नावालाच पदाधिकारी असून त्यांना कुठल्याही आंदोलनाशी काहीही घेणेदेणे नाही असे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल