….आणि नगरसेवकांनी मरगळ झटकली
नांदेड दि.२३ मे.( विजय निलंगेकर )
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे निवडणूक होऊन चार महिने उलटले तरीही नगरसेवकात चैतन्य निर्माण झाले नव्हते महानगरपालिकेच्या वार्षिक आराखडा मान्यता सभेची तारीख निश्चित होत नसताना विधान परिषदेचे निवडणुकीचे बिगुल वाजल्याने नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
लाखो रुपये खर्च करून नगरसेवकांनी निवडून निवडूनही आले परंतु गेल्या चार महिन्यापासून कुठल्याही प्रकारचे महापालिकेकडून विकास कामाचा निधी मिळत नसल्याने नगरसेवकात मर्ग पसरली होती आज ना उद्या आर्थिक विकासा आराखडा मान्यता मिळेल या आशेवर असलेल्या नगरसेवकांना मात्र गेल्या चार महिन्यापासून सभा होत नसल्याने मरगळ आली होती 2025 26 च्या आर्थिक आराखड्यास मंजुरी व 26 27 च्या आराखड्यास मान्यता देण्याची प्रक्रिया अपूर्णच राहिली महापौरांच्या निर्णयाच्या दिरंगाईमुळे सभा पुढे ढकलण्यात आली यामध्येच विधान परिषदेची निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने 22 जून पर्यंत सर्वसाधारण सभा घेता येणार नाही यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली अनेकांनी महापौरांना बोलूनही दाखविले सभा घ्या परंतु वरून आदेश न आल्याने सभा घेण्याचे धाडस महापौरणे दाखवले नाही लाखो रुपयांच्या खर्च झाल्याची खंत गेल्या चार महिन्यापासून मनात चालत असतानाच विधान परिषदेने मात्र आशेचा किरण दाखविला आहे परंतु यामध्येही एकतर्फी निवडणूक होईल असे बोलले जात असल्याने थोडी चलबीचलता वाढलीच आहे परंतु काल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी पक्षाची बैठक घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वातावरणात बदल झाल्याची दिसून येत आहे.
काँग्रेस पक्षाने अजूनही कुठलीही भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे पक्ष निवडणूक लढवेल की नाही याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला तर सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून भाजपाला हरवण्याची तयारी होऊ शकते. जिल्ह्यातील आकडेवारीचा खेळ पाहता भाजप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर इतर पक्ष एकत्रित येऊन फार मोठे आव्हान उभे करू शकतात असे चित्र दिसत असल्याने घोडेबाजार ही मोठ्या तेजीने चालेल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि या घोडेबाजारात मरगळलेले नगरसेवक उत्साहात येतील अशीही चर्चा रंगू लागली आहे.
भाजपातर्फे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा असली तरी जातीय राजकारण पुढे येऊन अमर राजूरकर यांना बाजूला सारावे लागते की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे मराठवाडा विभागामध्ये जातीय राजकारण करत असताना अमर राजूरकर यांना या निवडणुकीपासून बाजूला सरतील की काय असे वाटत आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी भरभराटीला आणले आहे केवळ त्यांच्यामुळेच मागच्या 70 वर्षापासून सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाला नांदेडमध्ये अनेक नगरपालिका तसेच महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करता आली यामुळे खा. अशोकराव चव्हाण जे ठरवतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती आज तरी आहे त्यामुळे अशोकराव चव्हाण हे अमर राजूरकर यांच्या नावाची शिफारस करतील असे बोलले जात आहे.










