Home / गुन्हा / सुमंत पाटील यांची नियुक्ती स्थानिक अधिकाऱ्यावर गदा आयुक्त डोईफोडे यांची भूमिका गोलमाल

सुमंत पाटील यांची नियुक्ती स्थानिक अधिकाऱ्यावर गदा आयुक्त डोईफोडे यांची भूमिका गोलमाल

सुमंत पाटील यांची नियुक्ती स्थानिक अधिकाऱ्यावर गदा
आयुक्त डोईफोडे यांची भूमिका गोलमाल

नांदेड (विजय निलंगेकर)
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये उप अभियंता या पदावर सुमन पाटील यांची नियमांची मोडतोड करून प्रभारी म्हणून नियुक्ती दिली ती स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारी आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे

सिडको प्रशासनात कार्यरत असलेले सुमन पाटील काही दिवसापूर्वी नांदेड महापालिकेत प्रतिनियुक्ती वर आले होते त्यानंतर येथील व्यवस्था व अवस्था त्यांना आवडल्याने त्यांनी चक्क सिडको प्रशासनाची राजीनामा देऊन नांदेडमध्येच नोकरी करण्याची ठाणले आणि तशी आखणी केली यामध्ये ते यशस्वी झाले आहेत पण यांची ही कुरघोडी स्थानिक अधिकाऱ्यांवर बसल्याची कळते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत सुमंत पाटील यांची नियुक्ती करत असताना सात अधिकारी या पदावर पात्रता धारक होते आणि ज्या राज्य शासनाचे अध्यक्षाने सुमन पाटील यांची नियुक्ती केली त्यामध्ये तीन क्रमांक च्या अटीला हरताळ फसून ही नियुक्ती केल्याची दिसून येत आहे तीन नंबरची अट असे म्हणते की यांची निवड ही महापालिकेत ज्येष्ठता यादीत नियुक्त झाले तारखेपासून सर्वात शेवटची समजावी तरीही यांना या सात लोकांना डावलून प्रभार दिल्याने या सर्व ज्येष्ठ लोकांना कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे. आणि अशी पद्धत ही पहिलीच नसून अनेक वेळा महापालिकेमध्ये असे प्रयोग झाले आहेत नंतर ओरड झाल्याने ती पद्धत थांबवली परंतु आता केवळ स्थानिकांना या पदावर पदस्थापना न देता नवख्या आलेल्या अधिकाऱ्याला पदस्थापना देण्याची घोडबंगाल काय आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सम्यक न्यूज लाईव्ह प्रकाशित केलेल्या वृत्ताने महापालिकेत वास्तवाची जाण झाल्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. सुमंत पाटील यांना नांदेडमध्ये कायम करण्याचे काम एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांनी भूमिका पार पाडल्याची चर्चा सम्यक न्यूज च्या वृत्तानन्तर चर्चिले जात आहे आणि हा व्यवसाइक माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या मर्जीतला असल्याचेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल