Home / राज्य / नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मार्च अखेर 53 कोटीच्या नफ्यात

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मार्च अखेर 53 कोटीच्या नफ्यात

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मार्च अखेर 53 कोटीच्या नफ्यात

नांदेड दि. 16 एप्रिल 2026

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन 2025-2026 या आर्थिक वर्षात्त भाग भांडवल मध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. या वर्षी मार्च अखेर बँकेला ढोबळ नफा 53.7 कोटी रुपये झाला तर वैधानिक तरतुदीनंतर निव्वळ नफा 7.33 कोटी रुपये झाला असून एनपीए कमी झाला असल्याची माहिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. ही बैंक नांदेड जिल्हयातील शेतक-यांची कामधेनू आहे.

या बँकेच्या पुर्नउभारणीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खा. अशोकराव चव्हाण व तत्कालिन अर्थ मंत्री स्व. अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही खतगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या बँकेवरचा ग्राहकांचा विश्वास वाढला असून या बँकेमध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहक ठेवी जमा करत आहेत. या बँकेच्या एकुण 63 शाखा असून 58 शाफा नफयात आहेत. ही प्रगती केवळ आकडयापुरती मर्यादीत नसून ती आपल्या संचालक मंडळाची व बैंक व्यवस्थापनाची असल्याचेही खतगावकर यांनी म्हटले आहे.

बँकेच्या या अर्थपूर्ण वाटचालीमध्ये बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी, सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही बँकेचे अध्यक्ष मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मा. आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सचालक बाळासाहेब रावणगावकर, गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, बाबुराव कोंढेकर, शिवराम लुटे, राजेंद्र केशवे, राजेश पावडे, व्यंकटराव जाळणे, श्रीमती विजयाताई शिंदे, शाम कदम, रामचंद्र मुसळे, माजी उपमहापौर सरजीतसिंग गील, एन.डी.पवार, जगनाथ चक्रावार, बँकेचे सीईओ श्री अजय कदम व सर्व कर्मचारी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल