संवाद अभ्यासिकेत महापुरुषांना जयंतीदिनी विद्यार्थ्यांकडून 18 तास अभ्यासात्मक अभिवादन
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची भेट
नांदेड दिनांक १७
संवाद अभ्यासिका यशवंत नगर नांदेड येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि. 11 एप्रिल रोजी 18 तास अभ्यास उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष कृतिशील अभिवादन करण्यात आले यात बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निशुल्क नाश्ता व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती नांदेड येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली संवाद अभ्यासिकेचे संचालक शंकरजी शिंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले
संवाद अभ्यासिकेतील जयंती अभ्यासात्मक व आदर्श असल्याचे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कायम डोळ्यासमोर ठेवून उज्वल यश संपादन करून प्रशासनात जावे असे आव्हान सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले अभ्यासिकेचे विद्यार्थी उत्तम सांगडे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून ठाणे पोलीस म्हणून यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे समाजकल्याण कार्यालयीन अधिकारी गजानन नरवाडे अभ्यासिकेचे संचालक शंकर जी. शिंगे व राष्ट्रपाल गोणारकर यांची उपस्थिती होती








