अतिवृष्टीग्रस्त बाधितांच्या विशेष पॅकेज व सवलतीच्या शासन आदेशात नांदेड जिल्हयाचा समावेश करण्याची आ. चिखलीकर यांची मागणी
नांदेड : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने विशेष पॅकेज आणि सवलतीची घोषणा केली असून या आदेशात नांदेड जिल्ह्याचा समावेश नाही. पुराचा आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या नांदेड जिल्ह्याचा या सवलती आणि विशेष पॅकेज मध्ये समावेश करून नवा अध्यादेश काढावा अशी मागणी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यातील बहुतांश जिल्हयामध्ये जून ते सप्टेबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे पुरामध्ये आपत्ती उध्दभवली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीत सर्वाधिक हानी ही नांदेड जिल्ह्याची झाली आहे. नांदेड जिल्हयात प्रचंड हमी, शेतीपिक नुकसान, शेतजमिन खरडुन जाने, मनुष्य हाणी, पशु हाणी, घरपरझड घरातील वस्तु, साहित्य, वैव्यतिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लाखो शेतकरी , शेतमजूर , पूरग्रस्त नागरिकांचे जीवन बाधित झाले आहे. आशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करण्यासाठी शासनाने 8 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार विशेष पॅकेज सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. परंतू या मध्ये नांदेड जिल्हयाचा समावेश नाही . वास्तविक महाराष्ट्रात सर्वात जास्त बाधित , आपत्तीग्रस्त नांदेड जिल्हा आहे. त्यामुळे शासनाच्या विशेष पॅकेज आणि सवलतींचा लाभ नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना , अतिवृष्टीग्रस्तान व्हावा . त्यांनाही जगण्याचे बळ मिळावे यासाठी नांदेड जिल्हयाचा समावेश सदर शासन आदेशात करुन नांदेड जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्ताना दिलासा द्यावा अशी मागणी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.मागणीचे निवेदन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनाही आ. चिखलीकर यांनी पाठवले आहे.
अतिवृष्टीग्रस्त बाधितांच्या विशेष पॅकेज व सवलतीच्या शासन आदेशात नांदेड जिल्हयाचा समावेश करण्याची आ. चिखलीकर यांची मागणी











