Home / शैक्षणिक / अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

नांदेडः अर्धापूर येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळया असल्याची वृत्त कळताच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ.श्रीजया चव्हाण यांनी वसतिगृहाला आज आकस्मिक भेट दिली. तेथील घडलेल्या प्रकाराची झाडाझडती घेतली.विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी वसतिगृह प्रशासनाला आवश्‍यक त्या सूचना केल्या.
अर्धापूर शहरातील शासकीय वसतिगृहात काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क अळया निघाल्याचा प्रकार घडला. या संदर्भात येथील विद्यार्थ्यांनी सरळ तहसील कार्यालय गाठले. व घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली. तशी तक्रारही दिली.
शासकीय वसतिगृहातील जेवणात अळया निघाल्याची बातमी आ.श्रीजया चव्हाण यांना कळताच त्यांनी पूर्वसूचना न देता थेट शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी एका वेळच्या जेवणा दरम्यान घडली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर आ.श्रीजया चव्हाण यांनी वसतिगृहाची संपूर्ण पाहणी केली. स्वच्छतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना यापूढे असा प्रकार घडू नये अशी तंबी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल