नांदेड शहरात सिनेमा सृष्टीतील गीतांची मेजवानी गेल्या काही वर्षापासून वाढली आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गामध्ये संगीतमय कार्यक्रम पाहण्याची ओढ लागली असून आता सभागृहात गर्दी व्हायला लागली आहे परंतु या प्रेक्षकांसोबत दगाफटका झाला असल्याची दिसून येत आहे झाले असे विश्वनाथ आप्पा हूरणे ज्युनिअर कॉलेज नांदेड व लायन्स क्लब नांदेड मिटवून यांच्यातर्फे गीतों की बरसात या मथळ्याखाली लता मंगेशकर मुकेश व मोहम्मद रफी यांच्या गीतांचे सादरीकरण डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह येथे दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले होते आयोजकांनी समाज माध्यम तसेच वृत्तपत्रात मोठे जाहिराती देऊन सर्व प्रेक्षकांना आव्हान केले होते की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा यामध्ये प्रवेश विनामूल्य पण काही जागा निमंत्र्यासाठी राखीव असे प्रसिद्ध करून प्रेक्षकांना कार्यक्रमास यावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला. परंतु प्रवेश फक्त पाच धारकांनाच असल्यामुळे येथे उपस्थित असलेले कर्मचाऱ्यांनी पास धरणाचं आत् सोडले यामुळे बाहेर उभे असलेल्या जवळजवळ 100 ते 200 प्रेक्षकांनी मात्र संताप व्यक्त केला.
संताप एवढा झाला की आयोजकांना बाहेर बोलवा आम्ही त्यांना बोलू असे बोलून या कर्मचाऱ्यांना दमदाटी करू लागले प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रम प्रवेश विनामूल्य असे अगोदर जाहीर केले आणि आज पास मागताहेत अगोदरच पास असल्याशिवाय प्रवेश नाही असे जाहीर केले असते तर आम्ही पास घेण्याचा प्रयत्न केला असता किंवा आलोच नसतो अशाही प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या काही प्रेक्षक तर नांदेड शहराबाहेरील होते त्यांनी खंत व्यक्त करत बोलले आम्ही काही पैसे खर्च करून इथपर्यंत आलोत आणि इथे आल्यानंतर कार्यक्रमाला प्रवेश नसलं तर आम्ही आता काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला वास्तविक आयोजकांतर्फे जे कोणी संयोजक होते यांचे कडे पासेस चे बंडल दिसून येत होते परंतु ते फक्त आपल्या ओळखीच्या लोकांनाच देत होते यामुळे ही येथील उपस्थित प्रेक्षकांना संताप होत होता











