Home / सामाजिक / नांदेड पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी इकडेही लक्ष द्यावे

नांदेड पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी इकडेही लक्ष द्यावे

नांदेड पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी इकडेही लक्ष द्यावे

नांदेड – (विजय निलंगेकर)
वरिष्ठा समोर काहीतरी करून दाखवण्याचे नादात आपण काय करतो याचे भान विसरल्याचे उदाहरण काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने पोलीस प्रशासनातील काही लोकांकडून दिसून आले

सकाळीच नांदेड शहरातील समता नगर येथील भीम जयंतीच्या मिरवणुकीसाठी येत असलेल्या डीजेचे वाहन ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवला आणि जवळजवळ चार ते पाच तास आढळून ठेवून शेवटी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी त्यांना आदेश दिल्यानंतर तो डीजे त्यांनी सोडला परत साडेचार वाजता ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बळीरामपूर येथील डीजे वाहनांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले इथे प्रश्न डीजे वाहने ताब्यात घेण्याचा नसून तो केवळ वर्ष अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी करण्यात आला प्रयत्न दिसून येत आहे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दोन दिवसापूर्वी स्पष्ट केले होते मिरवणुकीमध्ये डीजे वाजवायचे नाही परंतु ज्यांनी डीजे वाजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील यावर जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि पोलीस प्रशासनास यांच्या सामंजस्याने मिरवणुकीमध्ये प्लाजमा डीजे न वाजवण्याचा आश्वासन दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने ही साधे डीजे वाजवण्याची संमती दिली यामुळे अनेक मंडळांनी अगदी वेळेवर म्हणजेच 12 व 13 तारखेला काही डीजे बुक केले आणि ती वाहने नांदेडमध्ये येताना ही वाहने अडवण्यात आली

आजचा दिवशीची दुसरी घटना अशी रात्री दहा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी असतानाही नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी मिरवणुकीतील वाहने पोलिसांकडून अडून ती बंद करण्याचा आदेश देण्यात आली संमेक न्यूज लाईव्ह ने तसे छायाचित्रही घेतले आहे की नऊ वाजून 45 मिनिटाला पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी त्या वाहनांसमोर उभे राहून वाहनाला अडविले आणि पुढे हे जाऊ दिले नाही रात्री साडेनऊ वाजताच आयटीआय चौकात पोलिसांचा मोठा थवा उभा करण्यात आला यामुळे मिरवणुकीतील आंबेडकरांनी यांच्या मनामध्ये शंका कुशंका वाढल्या काय अपरित घडते की काय असे वाटू लागले यामुळे अनेकांनी मिरवणुकीतून परत जाण्यातच धन्यता मानले रात्री दहाच्या नंतर वाद्य वाजवण्यास बंदी असली तरी पायी जाणाऱ्यास कुठल्याही प्रकारची बंदी सुप्रीम कोर्टाने अजून तरी घातलेली नाही तरीही पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिरवणुकीतील आंबेडकरांनी यांना परत जाण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे दिसून आले हा सर्व प्रकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठीच या कर्मचाऱ्यांनी केल्याचा दिसून येत आहे नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची बदलीचे चर्चा पोलीस दलातच नव्हे तर नांदेड शहरात ऐकल्या जात आहे आणि एखादा वरिष्ठ अधिकारी जर बदलीने जात असेल तर काही कर्मचाऱ्यांची अडलेली कामे करूनच जातो असा प्रघात आहे आणि याच परिस्थितीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने काही कर्मचाऱ्यांनी असे कृत्य केल्याचे आता पोलीस दलातच बोलले जात आहे
नांदेड शहरात पाच पोलीस स्थानकात पाच वरिष्ठ अधिकारी एक स्थानिक गुन्हे शाखेचा अधिकारी, दोन पोलीस उपअधीक्षक एक पोलीस उपाधीक्षक गृह आणि त्यांच्या अधिनस्त शेकडो पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी एवढा ताफा असतानाही पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांना रात्रीच्या पेट्रोलिंग साठी रस्त्यावर का उतरावे लागत आहे याचाही विचार पोलीस अधीक्षकांनी करावयास हवा या घटनावर पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी बारक्याने लक्ष देऊन योग्य तो न्याय द्यावा असे आता बोलले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल