आदिवासी कोळी महादेव जमातीचा गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी सन्मान संपन्न
नांदेड दि. ९ ऑगस्ट – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नांदेड. जिल्हयातील सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने चालू शैक्षणिक प्राविण्य प्राप्त 10 वी 12 वी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश पात्र-उत्तीर्ण, शालेय स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी क्रिडा- संगीत क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी व संघ लोक सेवा आयोग, राज्य लोक सेवा आयोग बँकींग, रेल्वे, पोलीस विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या अशा 40 कर्मचा-यांचा नव्याने रूजू झालेल्या परभणी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी मंजूश्री कल्लेवाड व उप-शिक्षणाधिकारी बालाजी यरमुनवाड ,ज्युनिअर गटात बॉस्केट बॉल संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारी बालिका रितिका बालाजी नाईकवाडे या सह, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र- शिष्यवृत्ती धारक, सेट-नेट उत्तीर्ण अशा 80 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व गौरव पत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गुणवंत सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक मा प्रा. धाराशिव शिराळे यांनी उपस्थित गुणवंताना संबोधीत केले. साहित्य व क्रांतीचा इतिहास असलेली कोळी महादेव जमात शैक्षणिक ..सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होत असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला, आरक्षणाचा लाभ घेत आणखी अशी उंच – उंच शिखर गाठावित असे प्रतिपादन केले.
आदिवासी कोळी महादेव जमातीच्या न्याय हक्काच्या संघर्ष चळवळीत गेली चार दशके अहोरात्र मेहनत घेतली… जीवाचे रान करून समाजाच्या विकासासाठी शासन-प्रशासन- न्यायालयीन लढे उभारून समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे तन मन धन देणारे पाच सामाजिक कार्यकर्ते मा यादवराव तुडमे मा बी. एल. बैनवाड, मा. आनंदराव रेजितवाड, मा. शंकर महाजन पुटेवाड, आणि दिगंबर जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते कोळी महादेव जमात भूषण पुरस्कारासह सन्मान चिन्हगौरव पत्र प्रदान करत कृतज्ञतेने सन्मानीत केले,
सदरील कार्यक्रमासाठी जिल्हा घरातून मोठ्या संख्येने जमात बांधव
सोहळ्यात सहभागी होत प्रतिसाद दिला. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नागनाथ नागनाथ घिसेवाड,शशिकांत भूसेवाड, मा रमेश पिठ्ठलवाड मा. चंद्रकांत गुंगेवाड, मा के एन जेठेवाड, मा चंद्रमोहन चिंतल (उपप्रादेशिक चाहन अधिकारी) मा वसंत कलंबरकर, डॉ. बालाजी आदमपूरकर,मा. गंगाधर अनपलवार (उपसभापती) मा माधव पुनवाड, मा विठ्ठल दावेवार, केशव कुकलवाड,मा बाळासाहेब उलगुलवाड, मा भालचंद्र मोळके, प्रा. भगवान गुंजलवाड ,केशव जिंकलवाड, संदीप चिमलवाड मा. माधवराव, रेडेवाड, मा वीरभद्र मीरेवाड, मा मारोती बिचेवार, मा गुणवंत मिसलवाड, मा शिवाजी इरलेवाड मा पुंडलिक मोरे, राजू मदेवाड बालाजी काजलवाड ,मारोती पल्लेवाड सह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी केले. तर सुरेख सुत्रसंचलन मा ज्ञानेश्वर मरकंटे यांनी तर कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन गिरीश गलांडे यांनी मानले.
– विजय निलंगेकर











