Home / राजकारण / नवनियुक्त महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांची प्रतिक्रिया

नवनियुक्त महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षाने नांदेड महानगर अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली असून, संघटनात्मक पातळीवर तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी पक्षाच्या अपेक्षा सार्थ ठरवत उत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दुपारी भाजपच्या संघटनात्मक जिल्ह्यांच्या अध्यक्षांची यादी जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी राजूरकर म्हणाले की, या जबाबदारीसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे आभार मानतो. भाजपचे संघटन अधिक मजबूत करून नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे हेच माझे ध्येय राहिल, असेही अमरनाथ राजूरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल