Home / राजकारण / मग या मुलाखतीचं काय भाजपमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी राजकारण उघड

मग या मुलाखतीचं काय भाजपमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी राजकारण उघड

मग या मुलाखतीचं काय
भाजपमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी राजकारण उघड

नांदेड –
नांदेडच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीला स्थान मिळाल्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न चालू असतानाच पक्षप्रमुखांनी अजित गुपचडे यांना खासदारकी देऊन त्यांच्या सोबत बसविले याचा परिणाम कुरघोडी चे राजकारण दिसून येत आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकाचे लवकरच बिगुल वाजणार असून यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली आहे यातच भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी नांदेड उत्तर लोक विधानसभा मतदारसंघातील प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल रविवारी त्यांच्या महानगर कार्यालयात घेतल्या यावेळी माजी मंत्री डी पी सावंत हे उपस्थित होते एवढेच नव्हे तर दृकश्राव्य या माध्यमातून खा. अशोकराव चव्हाण यांनीही मुलाखत सूत्रामध्ये सहभाग नोंदविला हे सगळे होत असतानाच आज खासदार अजित गोपछडे यांनी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली आहे की महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीतील ज्या उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी दिनांक 13 व 14 या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय अंतोदय जनसंपर्क कार्यालय विद्युत नगर चौक आनंद नगर भाग्य नगर रोड नांदेड येथे उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे या मुलाखतीत भाजपा जिल्हा निवडणूक प्रभारी खासदार अशोकराव चव्हाण मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे जिल्हा अध्यक्ष एड. किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत राहणार असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी यावेळी उपस्थित राहून आपला बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावे असे म्हटले आहे.
मग काल दिनांक सात डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीचा काय असाही प्रश्न आता या उमेदवारांमध्ये उमटला आहे. जर या मुलाखती अनधिकृत असतील तर तसे डॉ. अजित गोपछडे यांनी जाहीर करावे अशी ही मागणी आता या मुलाखत देणाऱ्या इच्छुक उमेदवारामध्ये जोर धरत आहे.
या दोन्ही मुलाखती वरून भाजपामध्ये सगळं काही अलबेर आहे असं काही समजायची गरज नाही असे आता वाटत आहे खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांना क्रॉस चेक करण्यासाठी अनेक वेळा खासदार अजित गोपछडे यांनी प्रयत्न केले आहेत मागील काळा मधील शासनाच्या निर्णयामध्ये माझ्यामुळेच निर्णय झाले असे दोन्ही नेत्याकडून वारंवार सांगण्यात आले यावेळीही हस्तक्षेपंचा राजकारण जनतेच्या लक्षात आले परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत देऊन आता सरळ सरळ कुरघोडी चे राजकारण करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी चालू असल्याची चर्चा आता चवीने चालू आहे दिनांक सात डिसेंबर रोजी महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांनी इच्छुक उमेदवाराची मुलाखती घेतल्यानंतर डॉ. अजित गुपचडे यांनी मुलाखती सत्र लावून शहकटसह चे राजकारण चालू असल्याचे दाखवून दिले आहे.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल