नांदेड – आज दिनांक 21 जून रोजी नांदेड रेल्वे विभागात अंतर राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकांवरील कार्यालये आणि नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे इंस्टिट्यूट येथे योग दिवस साजरा करण्यात आला.
श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. श्री शिवा बिरकले, आर्ट ऑफ लिविंग समन्वयक, श्रीमती प्रगती सिंग, प्रियंका गंगाधीरे, श्री नागेश अनिलकंठवार योग शिक्षक, आर्ट ऑफ लिविंग यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगा चे महत्व सांगितले. योग केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभते हे त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना योग प्रशिक्षण दिले.
श्री प्रदीप कामले यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योग अभ्यासाचे महत्व उपस्थितांना सांगितली. श्री कामले यांनी सांगितले कि योग साधना सुरु करायला वयाची अट नसते तसेच इच्छुकांनी विशेष दिवसाची प्रतीक्षा न करता लगेच योग साधना सुरु करायला हवी आणि योग साधनेचा लाभ घ्यायला हवा असेही ते म्हणाले







