‘फ्लाय 91’ विमान कंपनीने नांदेड-बंगळुरू व नांदेड-गोवा विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
नांदेडकरांना गोवा जायचं म्हणले की खर्चिक बाब आणि वेळ ही पण जास्तीचा लागत असल्यामुळे अनेक वेळा मनात असूनही गोव्याला जाण्याचे टाळण्याची प्रसंग आले आहेत बाय रोड गेल्यानंतर कोल्हापूर येथून वाहन बदलण्याची वेळ नांदेड करावा होते किंवा स्वतःच्या वाहनाने जावे लागेल आता ही परिस्थिती बदलली असून नांदेडकरांना आता गोवा जवळ होणार आहे अनेक वर्षापासून ची मागणी पूर्ण होताना दिसून येत आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीची एक चमू नुकतीच नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळाला भेट देऊन या ठिकाणच्या सेवा सुविधा बद्दलची पाहणी करून गेले. या दोन्ही विमानसेवांचा शुभारंभ येत्या जुलैमध्ये सुरू होण्याचे संकेत आहेत. या विमानसेवांमुळे मराठवाड्यातील पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
– विजय निलंगेकर







