Home / राजकारण / नांदेड महापालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडेल का ? नगरसेवकांना आपले विचार मांडण्यास संधी मिळेल का ?

नांदेड महापालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडेल का ? नगरसेवकांना आपले विचार मांडण्यास संधी मिळेल का ?

नांदेड महापालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडेल का ? नगरसेवकांना आपले विचार मांडण्यास संधी मिळेल का ?

नांदेड – दि. ३० एप्रिल (विजय निलंगेकर)

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा आज पार पडत असून या सभेत नव्याने निवडून आलेले नगरसेवक विविध प्रश्न आपल्या डोक्यात घेऊन सभागृहात जाणार असल्याने ही सभा शांततेत पार पडते का मागच्या सर्वसाधारण सभे सारखे गोंधळ घालून विषय पास करून सभा संपवतील अशी चर्चा आता नांदेडमध्ये रंगू लागली आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार महिला प्रवर्गाला महापौर पदाचे आरक्षण सुटल्याने या पदावर कविता संतोष मुळे या विराजमान झाल्या परंतु राजकारणातील व समाजकारणातील अनुभव नसलेल्या या महिलेमुळे महानगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आपले म्हणणे योग्य की अयोग्य हे ठरवता येत नसल्यामुळे मागची सर्वसाधारण सभा गोंधळातच पार पडली विरोधी पक्षातून निवडून आले नगरसेवकांना सभागृहात बोलून दिल्याने त्यांनी आम्हाला बोलू द्या म्हणून गोंधळ घातला तर स्व पक्षातील नगरसेविका महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनाही या सभागृहात बोलण्याला वेळ मिळाला नाही अशातच काही नगरसेवकाने उभे राहून राष्ट्रगीत सादर करत सभा संपल्याचे जाहीर केले
आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा असून या सभेत केवळ अर्थसंकल्प स्थायी समितीने सादर करावयाचा आणि महापौराने स्वीकार करायचा एवढेच असल्याचे जाहीर करून शहरातील समस्यांना बगल देण्याचा प्रयत्न सभागृह करत आहे याचा विरोध करण्यासाठी स्वपक्षीय म्हणजेच भाजपाचे नगरसेवक आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तयारी केल्याचे बोलले जात आहे.

नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात एका डबक्यात पडून चार मुलांचा मृत्यू झाला या प्रकरणी अजूनही नांदेड शहर धगधगत आहे कारण चोरला सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार महापालिकडून झाला आहे यामध्ये महापौराची भूमिका अत्यंत शांत असून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न घेतल्याने निरपराध लोकांना सजा मिळाली अशी चर्चा उमरत आहे या प्रकरणात शहर अभियंता सुमंत पाटील यांच्या अधिकारात होत असलेली कामांच्या चुकामुळे पाणी साचले असे बोलले जात आहे परंतु त्यांना कुठलाही सुदान देता अधिनस्त असल्या कर्मचाऱ्यांना निलंबन केले आहे याचे दुःख मात्र नांदेडकरांना आहे हा प्रश्नही आज सभागृहात मांडण्यासाठी नगरसेवकांची तयारी असून हा विषय पटलावर येईल का नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.

प्रशासकीय काळामध्ये महानगरपालिकेमध्ये सुमन पाटील यांची पदस्थापना ही वादाच्या भोरत अडकली आहे अनेक नियम व अटी व शर्ती धाब्यावर ठेवून आयुक्त डोईफोडे यांनी सुमन पाटील यांना पदस्थापना दिली त्यावरही त्यांना प्रभारी म्हणून शहर अभियंता पद बहाल केले आणि शहरातील पात्रताधारक उपाभियंतांना डावण्यात आले त्यापैकी पाच जणांना देऊ नका परिसरातील घटनेची जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला आहे हा प्रकारही महापालिकेत रंगू लागला असून यावर नगरसेवकांनी आज सभागृहात आवाज उचलण्याचा ठरवले असून या आवाजाला साथ मिळतो का दाबल्या जातो ही चर्चा आता ऐकव्यास मिळत आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे 20२२ ते २६ पोरींचे लेखापरीक्षण झाले नाही अशी चर्चा आता पुढे येऊ लागली आहे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवकांनी महापुराणक पत्र दिले असून या पत्रात म्हटले आहे की महापालिकेचे परीक्षण झाले नाही याबाबतची चर्चा सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात यावी आता महापराकडे लक्ष लागून आहे की हा विषय सदर सर्वसाधारण सभेत घेतलं जाईल की नाही.

नांदेड शहरामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे यावरही काही नगरसेवक आपले विचार मांडण्याच्या तयारीत असून या प्रश्नावरही चर्चा होती की नाही अशी शंका आता व्यक्ती केली जात आहे.

शहरालगत असलेल्या गोदावरी नदीचा शुद्धीकरणाचा प्रश्नही एरणीवर आला असून या नदीत अकरा नाल्यामार्फत घाण पाणी सोडल्या जाते याबाबत अनेक नगरसेवकांनी ओरड केली असून यावरही चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवकाचे आहे या विषयावर ही चर्चा होईल की नाही अशी शंका आहे.

महापालिकेत असलेल्या खाजगी कंपनीमार्फत शहरातील साफसफाई चालू असून या साफसफाई कामगारांवर कंपनीने व महापालिकेने अनेक अन्याय केले असून त्यांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित असल्याने गेल्या तीन दिवसापासून महापालिकेवरती आंदोलन चालू आहे अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला मोर्चा काढण्यात आला द्वार सभा घेण्यात आली परंतु या आंदोलनाकडे पाण्याचा दृष्टिकोन अजूनही प्रशासनाचा नकारात्मक असल्याने कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा वाद शिगेला पोहोचण्याची दिसून येत आहे या विषयावरही अनेक नगरसेवकांचे चर्चा करण्याची इच्छा असून यावरही चर्चा होती की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.

नांदेड वाघेश्वर महानगरपालिकेतील निवडून आलेल्या काही नगरसेवकावरतीच महापालिकेतील कारभार असल्याची चर्चा आता उघड उघड होण्यास सुरुवात झाली असून इतर नगरसेवकांना विचारात न घेण्याचा प्रकार वाढण्याची दिसून येत आहे आज होणाऱ्या सभेची माहिती उभा करूनही नाही असे वृत्त सम्यक न्यूज लाईव्ह प्रकाशित झाले होते यानंतर अनेक चर्चेला उधाण येऊन महापौरांनी उपमहापौर्यांना चर्चेला बोलण्याची कळते अशा परिस्थितीत महापालिकेत भाजपा या पक्षाकडून एकला चलो रे अशी परिस्थिती निर्माण केली की काय असे बोलले जात आहे या सर्व प्रश्नांवर आज उत्तर मिळतीलच असे नाही परंतु नगरसेवकांच्या मनातील खदखद मात्र आजच्या सभेत दिसून येणार आहे आणि या समस्यांना महापौर कविता संतोष मुळे या कशा तोंड देतील याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल