पराभूत उमेदवारांच्या नादी लागू नका विकासासाठी चिखलीकर कुटुंब सक्षम – प्रवीण पाटील चिखलीकर

नांदेड – लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि चिखलीकर कुटुंबीय सक्षम आहे. त्यामुळे पराभूत आणि लबाडांच्या नादी लागू नका असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य परवीन पाटील चिखलीकर यांनी केले
आलेगाव ते आनंदनगर येथील एक कोटीच्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सभापती तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते नागरिकांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, या सर्कलमध्ये गेल्या पाच वर्षांच्या काळात रस्ते, नाले आणि विकासाच्या योजना राबविल्या. जिल्हापरिषदेच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविल्या आहेत. आलेगावच्या पाणंद रस्त्यासाठी १३ लाख रुपयांचा निधी अन्य कामांसाठी ३०लक्ष रुपयांचा निधी खेचून आणला. आलेगाव आणि चिखलीचे आमचे संबंध कै. शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्यापासूनचे आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी ठामपणे राहुद्या. निवडणूक जवळ आला की जातीवाद करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असते. लोकांची दिशााभूल करणे, हा त्यांचा कायमचा धंदा झाला आहे. त्यामुळे जनतेने संभाळून रहावे. चिखलीकर कुटुंबाने कधीही जातीवाद केला नाही. १९८४ मध्ये चिखली येथे शैक्षणिक संस्था उभारून या भागात शिक्षणाची गंगा आणली. त्यामुळे या भागातून असंख्य विद्यार्थी विविध शासकीय सेवेत रुजू झाले. स्वतःचा विकास करताना समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी त्यांनी हातभार लावला आहे. त्यामुळे चिखलीकर कुटुंबांनी नेहमीच सर्वांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. हे कुटुंब सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. आम्ही तुमच्या सुखात आणि दु:खात नेहमीच सहभागी आहोत. चिखली आणि सावळेश्वर हे दोन्ही गावे बारूळ जिल्हा परिषद गटात गेल्याने काही लोक आनंदी होत आहेत. परंतु या भागातही आ. चिखलीकर यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे या गटातही चिखलीकर साहेबांचे जिवाभावाचे लोक आहेत.त्यामुळे या भागातही लबाडांना संधी मिळणार नाही. विरोधकांना येथे आतापासूनच पराभव दिसू लागला असल्याने ते बिथरले आहेत. काहीही आरोप ते करतील. भूलथापा मरतील त्यामुळे अशा भूलथापाना बळी पडू नका असे आवाहन प्रवीण पाटील चिखलीकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर, पंचायत समीतीचे माजी सभापती शंकरराव ढगे, माजी पंचायत समिती सदस्य विजय मदावाड बसलिंग भुरे नाना पाटील इंगोले वैजनाथ पाटील घोरबांड,विनायक पाटील,साईनाथ कपाळे, सुरेश मामा पाष्टे, केशव पाटील सावळेश्वरकर, यांच्यासह परिसरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते .

यावेळी माजी सरपंच बालाजी पाटील वरताळे, उपसरपंच प्रकाशराव पाटील मोरे, ग्राप सदस्य मोहन मोरे, मारोती मोरे, दादाराव मोरे,आनंदा मोरे, शहाजी मोरे, माधवराव मोरे, यांच्यासह आले गावातील शेकडो ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संग्राम मोरे यांनी केले तर आभार परमेश्वर पाटील मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल