जानापुरी जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा
नांदेड दि 16 (प्रतिनिधी)
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन , जागतिक हात धुवा दिन, वाचू आनंदे व माझी शाळा – माझा उपक्रम या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार गाव व डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित व वाचकांचे महत्त्व सांगणारे दृकश्राव्य साधनांची माहिती राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका छायाताई बैस चंदेल यांनी विद्यार्थ्यांना दिली.
दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सविता कदम यांनी जागतिक हात धुवा या दिनाचे अवचित साधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सर्व विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्वांचे हात धुवून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नरवाडे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले.याप्रसंगी शिक्षक मोहिनी कोंडवार, विनायक देबडवार, प्रभावती तम्मेवार,मीरा कदम व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.











