नांदेड शहरातील कै. डॉ. शंकराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण सुसज्ज अशा व्यवस्थेसह सभागृह जनतेसाठी खुले होणार आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीच नगरपालिका असताना गुरुगोविंद सिंग जी स्टेडियम च्या बाजूच्या असलेल्या जागेवर कै. डॉ. शंकरराव चव्हाण हे हयातीत असतानाच त्यांच्या नावाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने सभागृह बांधण्याचा ठराव घेण्यात आला होता आणि त्यांच्या हयातीतच या सभागृहाला बांधकामाची सुरुवात झाली. गेल्या दशकामध्ये नांदेड शहरामध्ये या सभागृहात नाटक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी स्थान मिळत होते परंतु मागच्या काही वर्षात या सभागृहाला अवकाळा पसरली होती. याकडेच लक्ष देऊन महानगरपालिकेने 30कोटी रुपये खर्च करून या सभागृहाची देखभाल दुरुस्ती केली किंवा असे म्हणा संपूर्ण नूतनीकरणच केले आहे या सभागृहाचे बाह्यरूप व अंतर रूप दोन्ही बदलण्यात आले आहे दोन्ही आकर्षक असावी याकडे लक्ष दिल्याची दिसून येत आहे.

महाराष्ट्रात असे सभागृह आजच्या तारखेला तरी असतील अशी वाटत नाही अंतर कक्षात सुसज्ज असे असंव्यवस्था अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि नेटनेटके व्यवस्थापन करण्यात आले आहे नाट्य क्षेत्रातील ज्या काही सोई सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत संपूर्ण सभागृह वातानुकूलित करण्यात आले आहे. तर बाह्य स्वरूपातही बदल करण्यात आला आहे आकर्षक असे डिझाईन बनवून इमारतीची देखना पणा वाढवण्याची दिसून येत आहे.

या सभागृहाच्या उजव्या बाजूला असलेल्या गोकुळ नगर रस्ता या बाजूसच सभागृहाचे प्रवेशद्वार असणार असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी असलेले प्रवेशद्वार अडचणीचे होते क्रीडा संकुलच्या स्वागत कमान पासून सभागृहापर्यंत रस्ता ही व्यवस्थित नव्हता तर प्रकाशवस्था ही या ठिकाणी नव्हती त्यामुळे प्रेक्षक वर्ग इकडे येण्यास पाठ फिरवत होता पण आता गोकुळ नगर बाजूने प्रवेशद्वार केल्यास प्रेक्षक वर्ग या सभागृहात येण्यासाठी अतुर असेल असे वाटते. बाह्य परिसरात वाहने लावण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात आहे पूर्वी ज्याप्रमाणे संयोजकाला ध्वनी व्यवस्था, प्रकाशयोजना व लागणारे साहित्य बाहेरून भाड्याने आणावे लागत असे परंतु आता या सभागृहात सर्वच व्यवस्था उपलब्ध असल्याने गीत गायनातील कलाकारांना नाट्यक्षेत्रातील कलाकारांना, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल असे बोलले जात आहे.











