उपमहापौर दीपकसिंह रावत यांना अर्थसंकल्पीय सभेची माहितीच नाही
नांदेड दि. 27 एप्रिल
नांदेड वाघा शहर महानगरपालिकेत चाललंय तरी काय याची आता चर्चेला उधाण आले आहे अर्थसंकल्पीय सभेची तयारी करत असताना महापौर उपमहापौर व सभापती स्थायी समिती यांना विश्वासात घेऊनच बैठकीचे दिनांक वेळ ठरली जाते परंतु नांदेडमध्ये काय चाललंय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे त्याचे कारणही असे आहे की उपमहापौर दीपकसिंह राऊत यांना कुठल्याही प्रकारचे विश्वासात न घेता अर्थसंकल्पीय सभेची तारीख जाहीर केल्याचे दिसून येत आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी कै. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे यामध्ये 2025 -26 चा अर्थसंकल्प मान्यता व 26 -27 ची अंमलबजावणीसाठी स्थायी समितीकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी व त्या अर्थसंकल्पाचा स्वीकार करण्यासाठी बैठक ठेवली असून या बैठकीपासून उपमहापौर दीपकसिंह राऊत यांना दूर ठेवण्याचे महापालिकेत बोलल्या जात आहे याबाबतीत सम्यक न्यूज ला मिळालेले माहितीनुसार दीपकसिंह हे रावत यांना व त्यांच्या सर्व ग्रुप सदस्यांना महापौर माहिती देत नसल्याची माहिती मिळाली आहे यावरून महापौर एकला चलो रे चा नारा देत चालत आहेत का असही आता बोलल्या जात आहे.











