Home / राज्य / प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोका चौक नाम फलकासाठी मनपा समोर आंदोलन

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोका चौक नाम फलकासाठी मनपा समोर आंदोलन

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी महापालिकेला न कळवता वेगवेगळ्या महान व्यक्तीच्या नावाने रस्ता व चौकाचे नामकरण करून मोठमोठे फलक लावले आहेत परंतु आंबेडकरवादी विचारांच्या लोकांनी आपल्या आदर्शांच्या नावे चौकाचे नामकरण केले असता महानगरपालिका या नामकरण फलकांना काढून जप्त करत आहेत या विरोधात दिनांक 29 मे रोजी महानगरपालिकेच्या मुख्यमारतीसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची कृती समितीने कळविले आहे
काही वर्षांपूर्वी नांदेड शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा पाठीमागे चौकाला माता रमाई चौक असे नामकरण येथील रहिवाशांनी केले होते या चौकाचे फलकही एवढे वादग्रस्त झाले की सतत तीन दिवस पोलीस संरक्षणासाठी उभे करण्यात आले येथील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरले असून यांना हटवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर करावा लागला शेवटी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी यापूर्वीच नाव दिल्याचे सांगून पोलिसांच्या बळावर या नाम फलकास उकडून टाकण्यात आले
तसेच नांदेड शहरातील शासकीय रेस्ट हाऊस समोरील चौकस प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोका चौक असे नामकरण येथील आंबेडकरवादी लोकांनी करून या ठिकाणी फलक लावला

हा फलक महापालिकेने काढला त्यानंतर कृती समितीचे मुख्य संयोजक व भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर यांनी पाठपुरावा करून हा बोर्ड कोणी काढला याचा शोध घेतला आणि महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली की या ठिकाणी प्रियदर्शी सम्राट अशोका चौक अशी नाव देण्यात यावे यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोका अशा नावाचा फलक फलक लावला परंतु जातीवादी महापालिकेने दुसऱ्यांदाही हा बोर्ड काढून टाकला वास्तविक पाहता शहरांमध्ये अनेक ठिकाणी विविध आदर्शांची नावे चौक व रस्ते अशाच प्रकारे त्या जनतेने लावले आहेत आणि ती फलके आजही त्या ठिकाणी ताठ मानेने दिसत आहेत परंतु आंबेडकर वाद्यांनी आपल्या आदर्शचे नावाचे फलक लावले असता महापालिकेच्या मस्तकात बसते की काय असे दिसून येत आहे आणि म्हणूनच येथे फलक काढून टाकत आहेत या विरोधात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोका चौक संघर्ष समिती निर्माण करून या समितीतर्फे दिनांक 29 मे रोजी नांदेड शहर वाघाळा महानगरपालिका मुख्य कार्यालासमोर धरणे आंदोलने सकाळी 11 वाजता धरण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर यांनी कळविले आहे

One Comment

  • This is the right blog for anyone who wants to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want…HaHa). You definitely put a new spin on a topic thats been written about for years. Great stuff, just great!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल