नांदेड- विविध मागण्यांच्या अनुषंगाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समि तीच्या वतीने सोमवारी दि. २८ रोजी जिल्हा नियोजन भवनासम ोर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात येणार आहे.
दिव्यांगासाठी कुठल्याच सेवा हक्क का नाहीत याबाबत जवाब दो म्हणत आंदोलन करण्यात येणार आहे. पालकमंत्री, खासदार, आम दार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, बँक मॅनेजर, वन अधिकायांना घेराव घालण्यात येणार आहे. तसेच न्याय न मिळाल्यास १ में महाराष्ट्र दिनी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यालया, निवासस्थानी आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा घडविल्यास यास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहणार आहे. अशा आशयाचे निवेदन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे, उपाध्यक्ष आदित्य पाटील, युवा अध्यक्ष कार्तिक कुमार भरतीपुरम आणि शहराध्यक्ष सय्यद आरिफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड आणि वजिराबाद पोलीस स्टेशन नांदेड येथे देण्यात येणार आहे.








