नांदेड : माजी खासदार तथा लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपविधी मंडळ समिती प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. आज आ. चिखलीकर यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उपविधीमंडळ समिती प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबईत विधानभवनात हा पदभार सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला.
मुंबईत विधान भवन येथे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , विधान परिषदेचे सभापती राम शिंदे , विधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलमताई गोऱ्हे , विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे , लोक लेखा समितीचे प्रमुख विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचा एकत्रित उद्घाटन कार्यक्रम आज पार पडला . नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उपविधानमंडळ समिती प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली . आज त्यांनी विधानभवनात या समितीचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

यावेळी आ. सुधीर गाडगीळ , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव पाटील सावळे , अनिल पाटील बोरगावकर, उद्योजक गुलाब शुक्ला , सुनील पेनुरकर , शंकराव काळे , सुधाकरराव देशमुख , सत्यम शुक्ला यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.








