Home / महानगरपालिका / त्या प्रभागात विकास कामानिमिमित्त भेट – नगरसेवक मुन्ना अब्बास

त्या प्रभागात विकास कामानिमिमित्त भेट – नगरसेवक मुन्ना अब्बास

त्या प्रभागात विकास कामानिमिमित्त भेट – नगरसेवक मुन्ना अब्बास

नांदेड दि. २९
काँग्रेसचे दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचा पुण्यतिथी कार्यक्रम आटोपून नांदेड लोकन्याय विकास आघाडीचे गटनेते व इंजिनिअर प्रशांत इंगोले यांच्यासोबत नायगाव येथून परतत असताना आपण सुचविलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील ३० लाखांच्या तांत्रिक सल्ला मिळण्यासाठी रस्त्यात असलेल्या प्रस्तावित पथदिव्याच्या कामाची जागा त्यांना दाखविली. तेथून परतताना त्याच प्रभागातील एमआयएम नगरसेवक प्रतिनिधीने हे काम प्रस्तावित केल्याबद्दल रस्त्यावरच माझा सत्कार केला. यात कोणताही राजकीय हेतू किंवा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता किंवा अशा कोणत्याही कार्यक्रमाची मला पूर्वकल्पना नव्हती, असा खुलासा लोक न्याय विकास आघाडीचे सचिव व नगरसेवक मुन्ना अब्बास यांनी केला आहे.

मुन्ना अब्बास म्हणाले की, प्रभाग क्रम ांक १२ मध्ये सुचविलेल्या पथदिव्यांच्या कामात काही तांत्रिक भर घालण्याच्या उद्देशाने इंजिनिअर असलेले आमचे गटनेते प्रशांत इंगोले यांना प्रस्तावित पथदिव्यांची जागा दाखवून तेथून परतत होतो. त्यावेळी रस्त्यात एमआयएम नगरसेवक प्रतिनिधी भेटले आणि त्या प्रभागात निधी दिल्याबद्दल त्यांनी माझा रस्त्यावरच सत्कार करून माझे आभार मानले. तेथे कोणता कार्यक्रम होता किंवा कोण येणार होते, याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही आणि त्याच्याशी आपला दुरान्वये संबंध नाही, असे म्हणणे मुन्ना अब्बास यांनी मांडले आहे.

महापालिकेकडून मला मिळणाऱ्या वार्ड विकास निधीतील विजेच्या पथदिव्याच्या ३० लाख रुपयांची कामे मी माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या प्रभाग क्रमांक १२, या एकाच प्रभागात प्रस्तावित केली आहेत. त्या प्रभागात काँग्रेसला १२ हजार मते मिळाली. त्यामुळे मी माझा सर्व निधी तेथे दिला आहे.
– मुन्ना अब्बास, नगरसेवक, काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल