Samyaknews

नांदेड -मुंबई विमानसेवा परत बंद शिंदे सेनेच्या उद्योग मंत्राचा कटकारस्थान – ठाकरे सेनेचा आरोप

नांदेड -मुंबई विमानसेवा परत बंद शिंदे सेनेच्या उद्योग मंत्राचा कटकारस्थान – ठाकरे सेनेचा आरोप.

नांदेड मुंबई विमान सेवा शिंदे सेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कटकारस्तानामुळे परत बंद पडल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले.
नांदेड ते मुंबई बहुचर्चित विमानसेवा काही महिन्यापूर्वी मोठा गाजवा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी करून घेतला. नांदेडच्या विकासात हमेशा वक्रदृष्टी टाकणारे शिंदेसेनेचे उद्योग मंत्री यांचा हात असल्याचा संशय येतो. नांदेडच्या विविध उद्योगांना प्रोत्साहन देण्या ऐवजी नांदेडच्या प्रत्येक विकास कामाला टिपणी उद्योगमंत्र्यांनी केली. कृष्ण एमआयडीसी येथील नियोजित हेलिकॉप्टर प्रकल्प उद्योग मंत्राच्या अख्यारीत असताना मला माहीतच नाही म्हणून उत्तर देणे. आता तर गेल्या एक महिन्यापासून नांदेड मुंबई व मुंबई नांदेड विमानसेवा सर्वसामान्य प्रवाशासाठी बंद झाली. स्वतः मात्र उद्योग मंत्री चार्ट विमानाने नांदेडमध्ये वारंवार लँडिंग करतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबईला जाण्यासाठी नांदेड येथून जर विमान नसेल तर नांदेडच्या सत्ताधाऱ्याना मुंबई दिल्लीत काडीची ची किंमत नाही. असे दिसून येते. उद्योग मंत्राच्या अख्यारीत असलेला नांदेड विमानतळ एमआयडीसी चल विते असे असताना मुंबई. नांदेड विमानसेवा बंद होणे आश्चर्य वाटते. उद्योग मंत्राची वृक्षदृष्टी नांदेडवर असल्याचे सिद्ध होते. असा आरोप ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top