Home / सामाजिक / नांदेडकर भ्रष्टाचाराला खत पाणी घालतात का ?

नांदेडकर भ्रष्टाचाराला खत पाणी घालतात का ?

नांदेडकर भ्रष्टाचाराला खत पाणी घालतात का ?

नांदेड ( विजय निलंगेकर)
नांदेड जिल्ह्यात कार्यरत असताना तहसीलदार पदावर काम करत असलेले विजय चव्हाण व्यंकटेश मुंडे सारंग चव्हाण आणि सामाजीक वनीकरण अधिकारी श्रीनिवास लखमावाढ हे नांदेड जिल्ह्याबाहेर गेले असता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लाच लुचपत प्रतिबंध कायद्यानुसार त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या मग नांदेडमध्ये असताना ते स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी होते का असा प्रश्न आता पडला आहे. की नांदेड जिल्ह्यातील नागरिक भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात असाही प्रश्न आता समोर येत आहे
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील रहिवाशी श्रीनिवास लखमावाड हे उच्चपदस्थ अधिकारी वन विभागात कार्यरत असून गेली अनेक वर्ष नांदेड येथे काम करत असताना त्यांच्यावर कुणीही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही तसेच तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले विजय चव्हाण, सारंग चव्हाण आणि व्यंकटेश मुंडे यांनीही उजळ माथ्याने नोकरी केली असे बोलले जाते मग नांदेड शहराच्या बाहेर जातात यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत बेड्या ठोकल्या जातात याचाच अर्थ आहे की नांदेड शहरांमध्ये काम करत असताना ते भ्रष्टाचार करतच होते परंतु त्यांना खतपाणी नांदेडकर घालत होते आपले काम करून घेण्यासाठी नांदेडकर अधिकाऱ्यांना लाच देऊन आपली कामे करून घेतात असेच म्हणण्याची वेळ आता येत आहे.
नांदेड जिल्ह्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सर्वोच्च पद असलेले पोलीस उपमहानिरीक्षक यांचे कार्यालय नांदेड शहरात आहे याच पाठोपाठ पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात पदे असूनही हे अधिकारी यांच्या गळाला कसे लागले नाही असाही प्रश्न आता पडत चाललेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल