Home / राजकारण / आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

नांदेड दी.29 जुलै
मराठवाड्याचे लोकनेते, नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार व सम ाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कीर्तन सोहळा शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड शहरातील आशीर्वाद गार्डन मंगल कार्यालय, छत्रपती चौक येथे होणार आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या विनोदी, मिश्कील आणि बोचऱ्या शैलीतून सामाजिक वास्तवावर भाष्य करत जनजागृती करणारे लोकप्रिय कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनातून मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा संदेश मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष माधव पावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संग्राम पाटील मोरे यांनी केले आहे. या कीर्तन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजप्रबोधनाच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माधवराव पावडे व संग्राम पाटील मोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त १ ऑगस्टपासून पाच दिवस नांदेडसह कंधार व लोहा मतदारसंघात विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल