Samyaknews

बुद्ध विहार, पोलीस ठाणे बांधकामाची आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली पाहणी

बुद्ध विहार, पोलीस ठाणे बांधकामाची आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली पाहणी

नांदेड दि १३ जुलै
जिल्ह्यात सर्वात मोठे बुद्ध विहार लोहा शहरात साकारत असून ही वास्तू ज्ञानकेंद्र व्हावे यासाठी खुद्द आ.प्रतापराव पाटील।प्रयत्नशील आहेत तसेच पोलीस ठाण्याच्या इमारती पूर्णत्वास जाण्यासाठी व काही बदल करण्यासाठी डीवायएसपी ,पोलीस निरीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली तसेच या दोन्ही इमारतीच्या बांधकामाची आ चिखलीकर यांनीं पाहणी व उपयुक्त सूचना दिल्या
रविवारी १२ जुलै रोजी आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा पोलीस ठाण्याच्या इमारतीस भेट दिली त्याच्या पहिल्या टर्म मध्ये इमारत मजुरी मिळाली व त्यानंतर बांधकामास सुरुवात झाली पण या इमारतीची रचना पोलीस ठाण्यासाठी अडचणीची ठरणारी आहे त्यामुळे आ चिखलीकर यांनी काही सूचना सांगितल्या डीवायएसपी जुमडे, नगराध्यक्ष शरद पवार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे, सा.बा विभागाचे उपअभियंता पाटील , माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,बालाजी खिल्लारे, भास्कर पवार, नगरसेवक अविनाश पवार, केतन खिल्लारे, गणेश बगाडे, बाळू पवार, शहाजी पवार, श्रीकांत मंजलवाड, मारुती जंगले, सचिन मुकदम, अनिल धुतमल, इमाम लदाफ, निहाल मन्सूरी, यासह पदाधिकारी उपस्थित होते
आ प्रतापराव यांनी पोलिस ठाण्यात जाऊन बांधकाम पाहणी केली अडीअडचणी जाऊन घेतल्या डीवायएसपी श्री जुमडे, पोलीस निरीक्षक जाधव ,बांधकाम विभागाचे उपाभियंता सुमित जाधव यांनी चर्चा केली व काही सुधारणा सांगितल्या. शिवाय ठाण्यात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना काही भौतिक सुविधा कमी आहेत काय याची माहिती जाणून घेतली व त्याची सोडवणूक करण्याचे आश्वासित केले
आ प्रतापराव याच्या ड्रीम प्रजोक्त पैकी लोह्यातील बुद्ध विहार असून जिल्ह्यातील सर्वात मोठे विहार साकारत आहे.त्याची पाहणी केली आणि नवीन काही बाबी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या तसेच कमान, बाथरूम बोअरवेल, गेट तसेच विहारा समोर जागा रुंद करण्यासाठी नालीवर स्लॅब टाकण्यासाठी सूचना दिल्या .आ प्रतापराव पाटील यांचा माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक गणेश बगाडे, अनिल धुतमल , इमाम लदाफ, निहाल मन्सूरी, अमुराजा शेख,
यांनी सत्कार केला त्यानंतर नगरपालिका करत असलेल्या कामाची पाहणी केली

1 thought on “बुद्ध विहार, पोलीस ठाणे बांधकामाची आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली पाहणी”

  1. If you love discovering fresh titles this place is an absolute treasure trove of entertainment. They partner with top studio developers so the graphics and mechanics are always cutting edge. I tested the deposit speed and it was instant while withdrawal hit my wallet in under half an hour. Great job building a reliable space for online gaming enthusiasts who value quality. gamezoneonlinecasino

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top