वृत्तवाहिन्यांनी नांदेडच्या महापौर पदी कविता मुळे आणि उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड केली आता निवडणूक घ्यायची गरज नाही का ?
नांदेड दि . ६ फेब्रुवारी २६
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता मिळवली असली तरी निवडणूक झाल्याशिवाय कुठलीही निवड कायदेशीर ठरत नाही एवढा साधा प्रश्न किंवा साधा विचार वृत्तवाहिन्यांना आला नाही का असा प्रश्न आता नांदेडकरांना पडला आहे आजपासून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडी स्त्री प्रक्रिया सुरू झाली आणि भारतीय जनता पार्टी कडून महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपक रावत यांची नावे निश्चित करून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतामध्ये लोकशाही चालते आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे या नोंदणीत आपला पराभव आहे हे माहीत असूनही केवळ लोकशाही पद्धतीने निवड झाली पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी दाखल केली आहे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीची मूल्य जोपासले आहे त्याप्रमाणे वृत्तवाहिन्यांनी मात्र हे मूल्य धुळीस मिळवण्याची चर्चाही रंगू लागली आहे
दिनांक 10 फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होणार असून या निवडणुकीत दोन दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक आढळ आहे तरीही वर्तवाहिन्यांनी निवड झाल्याचे घोषित करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून घेण्याची पात्रता कमी केल्याची भावना आता नांदेड करा मध्ये चर्चेला जात आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील हे निश्चित असले तरी निवडणूक होऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत निवड निश्चित मानली जात नाही तरीही घाई कशासाठी चालू आहे याची चर्चा मात्र आता खमंग होत चाललेली दिसून येत आहे
-विजय निलंगेकर











