Home / राजकारण / स्व.अजितदादांना नांदेडमध्ये सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली

स्व.अजितदादांना नांदेडमध्ये सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली

स्व.अजितदादांना नांदेडमध्ये सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली

नांदेड : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांना सर्व पक्षीय मान्यवर व पदाधिकाऱ्यांकडून शंकराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शोकसभेस सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्व.अजित दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेनी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व पक्षीय शहर जिल्हाध्यक्षांनी संयुक्तरित्या करण्यात आले होते.

या शोकसभेत माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर, नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, सुरेशदादा गायकवाड, प्रा.यशपाल भिंगे, प्रवीण पाटील चिखलीकर, बबनराव बारसे, प्रवीण साले, राजेश पावडे, माजी महापौर अब्दुल सत्तार, हर्षद शहा,शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी महापौर सौ.जयश्रीताई पावडे, प्रशांत इंगोले, मराठा सेवा संघाचे श्याम पाटील वडजे, छावा संघटनेच्या वतीने दशरथ पाटील कपाटे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ.अर्पणाताई नेरलकरयांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रामगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष माधव पावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल