Home / राजकारण / काँग्रेस पक्षाला मुस्लिम बांधव आणि बौद्ध बांधव यांनीच तारल

काँग्रेस पक्षाला मुस्लिम बांधव आणि बौद्ध बांधव यांनीच तारल

काँग्रेस पक्षाला मुस्लिम बांधव आणि बौद्ध बांधव यांनीच तारल

नांदेड दि. 19 – विजय निलंगेकर
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मुस्लिम आणि बौद्ध समाजाने तारले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे महानगरपालिकेच्या 81 जागांची निवडणूक पार पडली यामध्ये काँग्रेसने आपले अस्तित्व दाखवण्याचं ऑटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांना अपेक्षित यश आले नाही तरीही वंचितच्या आघाडीने काँग्रेसला तारल्याचे दिसून येत आहे ज्या मतदारसंघांमध्ये बौद्धांची संख्या जास्त आहे आणि मुस्लिमांची संख्या आहे याच ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना यश प्राप्त झाल्याचे दिसते
प्रभाग क्रमांक 18 मधून चारही उमेदवार निवडून आले आहेत या ठिकाणी बौद्ध बंधू आणि मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे या ठिकाणी तीन नगरसेवक मुस्लिम समाजाचे तर एक बौद्ध समाजाचा निवडून आला आहे या प्रभागातील काँग्रेसचे नेते रमेश गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली मोहसीन खान महमूद खान, माहेजबीन अब्दुल फएम, हुसेन शोएब मजहर, गोडबोले ज्योत्स्ना राजू या उमेदवारांनी प्रचंड मते मिळवून विजय प्राप्त केला आहे

प्रभाग क्रमांक 14 हा प्रभाग मुस्लिम बहुल एरिया असून या ठिकाणी अब्दुल अहमद बाबुभाई खोकेवाले यांनी विजय प्राप्त केला आहे तर प्रभाग क्रमांक 12 हा सुद्धा मुस्लिम बहुल एरिया असून या ठिकाणी माजी उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, हमीबा बी शेख बाबू यांनी विजय प्राप्त केला आहे तर प्रभाग क्रमांक दोन हा सुद्धा मुस्लिम बहुल असून या ठिकाणी आफिया खाजी नाफे यांनी विजय प्राप्त केला आहे तर प्रभाग क्रमांक आठ नांदेड शहरातील सर्वांचे लक्ष असलेला शिवाजीनगर भाग या भागातही मुस्लिम बांधवांनी बौद्ध बांधव यांची संख्या लक्षणीय आहे परंतु हा प्रभाग राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा असल्याने सर्व नांदेडकरांचेच काय तर राज्याचे लक्ष याच भागात होते आणि येथूनच बौद्ध समाजाचे सत्यपाल भागोजी सावंत आणि मुस्लिम समाजाच्या परविन बेगम शेख पाशा यांनी विजय प्राप्त केला आहे एकूण दहा नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले असून यापैकी आठ मुस्लिम बांधव तर दोन बौद्ध बांधव यांची वर्णी लागली आहे या निकालावरून असे स्पष्ट होत आहे की काँग्रेस पक्षाला केवळ बौद्ध आणि मुस्लिम समाजाने तारले आहे राजकारणाची धागेद्वारे इतर समाजाच्या नेत्यांच्या हातात असूनही त्यांनी आपल्या प्रभागातही प्रभाव दाखवू शकले नाहीत याचाही काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज दिसून येत आहे अनेक ठिकाणी तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना 598, 399, 906 अशी मते मिळाली आहेत यावरूनही या उमेदवारांची प्रभागातील प्रभाव दिसून येत आहे यापेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी कमीत कमी 1598 एवढी मते मिळवली आहेत आणि इतरांनी यापेक्षा जास्त यावरूनही राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज काँग्रेस पक्षाला दिसून येते.

काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याची धुरा सांभाळणारे खासदार रवींद्र चव्हाण यांचे काका आनंद चव्हाण यांनाही यश प्राप्त करता आले नाही. नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचे सुपुत्र यांनाही पराभवाचे चेहरा पाहावा लागला या ठिकाणीही जिल्हाध्यक्षांची राजकीय परिस्थिती कळते काँग्रेस पक्षातील राजकारणात अनेक मंडळी जसे शाम दरक अनिल मोरे माजी आमदार बेटमोगरेकर हनुमंतराव प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी काँग्रेस पक्षाची धुरा आपल्याच खांद्यावर आहे असे भासवत आले परंतु यांना आपला प्रभाव दाखवता आला नसल्याने आता शहरात चर्चेला रंग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल