Home / गुन्हा / महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या डॉ कुंटूरकर यांना नातेवाईकांकडून कार्यालयातच बेदम चोप

महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या डॉ कुंटूरकर यांना नातेवाईकांकडून कार्यालयातच बेदम चोप

नांदेड महापालिकेच्या कौठा येथील महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या डॉ कुंटूरकर यांना नातेवाईकांकडून कार्यालयातच बेदम चोप

नांदेड : (म नेता)
महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांनी एका महिला कर्मचाऱ्यांची छेड काढली असल्याच्या कारणावरून महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांना त्यांच्या कार्यालयातच बेदम मारहाण केली आहे. दरम्यान सदरील प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसून आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी सदरील प्रकरण महिला तक्रार निवारण समितीकडे वर्ग केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले आहे.
याबाबतची खळबळजनक माहिती अशी की, नांदेड शहरातील कौठा भागातील महापालिकेच्या रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांस वैद्यकीय अधिकारी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांनी छेडछाड करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना त्या महिलेने आपल्या नातेवाईकांना सांगितली. दुसर्या दिवसी सदर महिला कर्मचारी व त्यांचे नातेवाईक वैद्यकीय अधिकारी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांच्या कक्षात येऊन महिला कर्मचारी यांची छेड का काढली म्हणून डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांना जाब विचारला. त्यावेळी सदर महिला कर्मचारी व डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी संतापलेल्या दोन जणांनी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांना त्यांच्या कार्यालयातच मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर डॉक्टरांनी त्या नातेवाईकांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र ते खुर्चीवर बसून असल्यामुळे त्यांना उठता येत नव्हते. सदर महिला कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांनी कार्यालयातच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांनी सदर महिलेची छेड काढली नसल्याचे नातेवाईकांना सांगितले पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांच्या मदतीला कार्यालयातील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक धाऊन आले. सदर कर्मचाऱ्यांनी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर यांची त्या नातेवाईकांच्या तावडीतून सुटका केली. सदरील घटना घडून बराच कालावधी उलटला असला तरी याबाबत महापालिका प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. तसेच सदर प्रकरणात पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र सदर मारहाण प्रकरणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला असून घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी सदर प्रकरण महिला तक्रार निवारण समितीकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर प्रकरणांची महापालिका कर्मचाऱ्यांत चवीने चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल