Samyaknews

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून निवड

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून निवड

नांदेड दि.- राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आली त्या यादीत आ. चिखलीकर यांचाही समावेश आहे. केवळ नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जॉईंट किलर म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे ते नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि लोक कल्याणासाठी सदैव तत्पर असणारे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या खांद्यावर आपल्या पक्षाने जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत पक्षाला बळकटी मिळवून देण्याचे काम केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झेंडा त्यांनी फडकवला. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे. अनेक माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खेचून आणल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती , माजी सदस्य , असंख्य ग्रामपंचायतचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, माजी नगरसेवक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत पक्षाला बळकटी देण्याचे काम त्यांनी केले आहे आणि हे काम अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे योगदान , संघटना बांधणीतील त्यांची स्पष्ट भूमिका यामुळे मा.ना.अजितदादा पवार, मा. प्रफुलभाई पटेल, मा. खा. सुनीलजी तटकरे यांच्या स्टार प्रचारकांमध्ये आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मन्याड खोऱ्याची ही डरकाळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गुंजणार आहे.स्टार प्रचारक म्हणून आपली निवड केल्याबद्दल आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top